Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये बंदी! FWICE चा असहकार्याचा मोठा निर्णय; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर खळबळ

रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये बंदी! FWICE चा असहकार्याचा मोठा निर्णय; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर खळबळ


बॉलिवूडचा धुरंधर अभिनेता रणवीर सिंह एका अत्यंत मोठ्या वादात अडकला असून, चित्रपटसृष्टीतील कामगार संघटनेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने रणवीर सिंहविरोधात आक्रमक पाऊल उचलत त्याच्यावर बंदी घातली आहे.

दिग्दर्शक फरहान अख्तरच्या बहुप्रतिक्षित अशा डॉन ३ चित्रपटातून रणवीर सिंहने ऐनवेळी आणि अचानक माघार घेतल्यामुळे संघटनेने हा अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. या बंदीचा अर्थ असा की, आता एफडब्ल्यूआयसीईशी संबंधित असलेला कोणताही कलाकार, तंत्रज्ञ किंवा कामगार रणवीर सिंहसोबत काम करणार नाही. त्यामुळे रणवीर सिंहच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

शूटिंगला अवघे ३ आठवडे उरले असताना रणवीरचा 'वॉकआऊट'
एफडब्ल्यूआयसीईचे मुख्य सल्लागार आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी या संपूर्ण वादाचे कारण सांगितले. अशोक पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद ११ एप्रिल रोजी सुरू झाला. चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते आणि संपूर्ण युनिट परदेशी रवाना होण्यासाठी अवघे ३ आठवडे उरले होते. अशावेळी रणवीर सिंहने अचानक डॉन ३ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मुख्य अभिनेत्यानेच चित्रपटातून हात काढून घेतल्यामुळे निर्मात्यासमोर मोठे संकट उभे राहिले.

"११ एप्रिल रोजी चित्रपट निर्माते फरहान अख्तर यांनी अभिनेता रणवीर सिंहविरोधात लेखी तक्रार दाखल केली. रणवीरने ऐनवेळी चित्रपटातून माघार घेतल्याने मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर आम्ही हे प्रकरण पुढील कारवाईसाठी अधिकृतपणे एफडब्ल्यूआयसीईकडे सोपवले," असे अशोक पंडित यांनी म्हटलं.

एक्सेल एंटरटेनमेंटचे कोट्यवधींचे नुकसान; मध्यस्थीचे प्रयत्न अपयशी

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसने डॉन ३ च्या प्री-प्रोडक्शनवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला होता. रणवीर सिंहच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे निर्मात्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

हा वाद मिटवण्यासाठी प्रॉड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोन्ही बाजूंमधील चर्चा अपयशी ठरली आणि यावर कोणताही अंतिम तोडगा निघू शकला नाही. अखेर पाच महिन्यांच्या अंतर्गत बैठकांनंतर कामगार संघटनेने रणवीर सिंहवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

रणवीरच्या कारकिर्दीला मोठा ब्रेक लागण्याची शक्यता
पद्मावत, सिम्बा, बाजीराव मस्तानी, गल्ली बॉय आणि राम-लीला यांसारखे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या रणवीर सिंहसाठी हा निर्णय अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. जर फिल्म इंडस्ट्रीतील तंत्रज्ञ आणि कामगारांनी रणवीरसोबत काम करण्यास नकार दिला, तर त्याच्या पुढच्या चित्रपटांचे शूटिंग पूर्णपणे ठप्प होऊ शकते. आता या संपूर्ण वादावर रणवीर सिंह काय भूमिका घेतो, याकडे संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.