Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फडणवीसांचा एका रात्रीत मोठा निर्णय! मुंबई पोलीस दलातील 'या' ६ मोठ्या IPS अधिकाऱ्यांची झाली बदली; पाहा संपूर्ण यादी

फडणवीसांचा एका रात्रीत मोठा निर्णय! मुंबई पोलीस दलातील 'या' ६ मोठ्या IPS अधिकाऱ्यांची झाली बदली; पाहा संपूर्ण यादी 


मुंबई : महाराष्ट्र गृह विभागाने राज्यातील महत्त्वाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच केल्या होत्या. आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकडे मोर्चा वळवला असून पोलीस पोलीस दलातील उपायुक्तांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलातील सहा बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रविवारी जारी करण्यात आले. प्रशासकीय कारणास्तव आणि मुंबईतील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत व गतिमान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (एन) (२) अन्वये हे आदेश जारी करण्यात आले असून, पोलीस आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?
DCP मनीष कलवानिया : परिमंडळ 8 वरून परिमंडळ 1 मध्ये बदली
DCP राघासुधा आर : परिमंडळ 4 वरून परिमंडळ 2 मध्ये बदली
निमित्त गोयल : विशेष कृती दलातून परिमंडळ 8 मध्ये बदली
DCP मोहित कुमार गर्ग : परिमंडळ 2 वरून परिमंडळ 9 मध्ये बदली
आयपीएस संदीप घुगे : राज्य गुप्त विभाग वार्ता येथून परिमंडळ 11 मध्ये बदली
गजानन राजमाने : फोर्स वनच्या पोलीस अधीक्षक पदावरून परिमंडळ 12 मध्ये बदली
महत्त्वाच्या परिमंडळांना नवीन आणि अनुभवी वरिष्ठ अधिकारी मिळाले

मुंबईतील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आणि आगामी काळातील आव्हाने पाहता हे फेरबदल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. फोर्स वनसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागाचे नेतृत्व भूषवलेले गजानन राजमाने यांच्याकडे आता परिमंडळ १२ ची धुरा सोपवण्यात आली आहे, तर राज्य गुप्त वार्ता विभागातून संदीप घुगे यांना परिमंडळ ११ मध्ये आणण्यात आले आहे. या बदल्यांमुळे मुंबईतील अनेक महत्त्वाच्या परिमंडळांना नवीन आणि अनुभवी वरिष्ठ अधिकारी मिळाले असून, यामुळे पोलीस प्रशासकीय कामकाजाला अधिक वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तीन दिवसांपूर्वीच राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

संजय दराडे- कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, आता पुण्याचे नवे सह पोलीस आयुक्त
रंजनकुमार शर्मा- पुण्याचे विद्यमान सह पोलीस आयुक्त, आता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक
तेजस्वी सातपुते- राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक, आता पदोन्नतीने पुण्याच्या गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.