पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अबूधाबी दौऱ्यावर गेले असताना त्यांच्यासोबत असं काही घडलं की ज्यामुळे जगभरात चर्चा सुरू झाली. आबूधाबीमध्ये राष्ट्रपतींनी पीएम मोदींचं स्वागत केलं त्यांना गार्ड ऑउ ऑनर दिला, मात्र त्याच वेळी UAE च्या हवाई क्षेत्रात प्रवेश करताच F16 फायटर फायटर जेट विमानांनी एस्कॉर्ट केलं. याचा व्हिडीओ समोर आला आणि त्यानंतर जगभरात चर्चा रंगली.
कोणत्या विषयांवर झाली चर्चा
पीएम मोदी आणि संयुक्त अरब अमीरातचे अधिकारी यांच्यात द्विपक्षीय चर्चा आणि काही करारांवर चर्चा झाली. दोन्ही देशातील व्यापार आणि अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या अत्यंत महत्त्वाच्या दौऱ्यावर आहेत. भारताचे मध्य पूर्व आणि युरोपातील देशांशी असलेले राजनैतिक आणि आर्थिक संबंध नव्या उंचीवर स्तरावर पोहोचवण्यासाठी हे दौरे महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.
ऊर्जा आणि भारतीयांच्या हितावर लक्ष
पंतप्रधानांच्या या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत आणि यूएई मधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करणे आहे. यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी होणाऱ्या चर्चेत व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा सुरक्षा यावर विशेष भर दिला जाईल. एलपीजी (LPG) आणि स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हच्या क्षेत्रात दोन मोठे सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे.
९ वर्षांनंतर पंतप्रधानांची भेट
दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी नेदरलँडचा दौरा करणार आहेत. २०१७ नंतर पंतप्रधानांचा हा या देशाचा दुसरा दौरा आहे. यादरम्यान ते किंग विलेम-अलेक्झांडर आणि क्वीन मॅक्सिमा यांची भेट घेतील, तसेच पंतप्रधान रॉब जेटन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. जलव्यवस्थापन आणि कृषी क्षेत्रातवर विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे. या दरम्यान होणारे करार हे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे ठरणार आहेत.
व्यापाराचे नवे मार्ग शोधणार
दौऱ्याच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पंतप्रधान स्वीडनमधील गोथेनबर्ग येथे जाणार आहेत. तेथील पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांच्याशी चर्चा करून दोन्ही देशांमधील व्यापाराला गती देण्यासाठी नवीन संधींचा शोध घेतला जाईल. तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये भारत आणि स्वीडनची भागीदारी वाढवणे हा या भेटीचा मुख्य हेतू आहे.
परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, या दौऱ्यामुळे आखाती देश आणि युरोपातील महत्त्वाच्या भागीदारांशी भारताचे आर्थिक नाते अधिक घट्ट होईल. विशेषतः जागतिक स्तरावर सुरू असलेल्या ऊर्जा संकटामुळे यूएईसोबतचा पेट्रोलियम क्षेत्रातील करार भारतासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.