व्हेनेझुएलामध्ये दोन भूकंपाचे मोठे धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे. एक 7.2 तर दुसरा 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून हा भूकंपामध्ये जवळपास 10 हजार जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून रायटर वृत्तसंस्थेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भूकंपामुळे व्हेनेझुएलामध्ये आपत्तकालीन परिस्थिती घोषित करण्यात आली असून बचावकार्य सुरु आहे.
या भूकंपामुळे आत्तापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला? याबाबत अधिकृत आकडा समोर आलेला नसून 10 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू नागरी वस्तीतच असल्याचीही माहिती सांगण्यात येत असून राजधानी कॅराकसमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर कॅरिबियन बेटांसाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.