Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत भाजपची जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक; बूथ सक्षमीकरण, विस्तार आणि आगामी रणनीतीवर सविस्तर मंथन!

सांगलीत भाजपची जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक; बूथ सक्षमीकरण, विस्तार आणि आगामी रणनीतीवर सविस्तर मंथन!


​सांगली :- भारतीय जनता पक्ष, सांगली शहर व ग्रामीणच्या वतीने सांगलीतील 'खरे सांस्कृतिक मंगल कार्यालय' येथे जिल्हास्तरीय संघटनात्मक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. आगामी काळातील निवडणुका आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, पक्ष संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि जनसंपर्काभिमुख करण्यासाठी या बैठकीत सविस्तर व व्यापक चर्चा करण्यात आली. ​या बैठकीस भाजप प्रदेश सरचिटणीस तथा विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रम पाचपुते तसेच भाजप पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक विक्रम पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

​बूथ स्तरावर पकड मजबूत करण्याचा निर्धार
​बैठकीदरम्यान पक्षविस्तार मोहिमा, बूथ स्तरावरील सक्षमीकरण आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय वाढवून पक्षाची तळागाळातील पकड अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या लोकहितकारी योजना प्रभावीपणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच पक्षाच्या विचारधारेचा व्यापक प्रसार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन यावेळी प्रमुख नेत्यांनी केले.
​शहर आणि ग्रामीणचा संघटनात्मक आढावा सादर

​याप्रसंगी सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी शहर जिल्ह्यातील संघटनात्मक कामांचा सविस्तर आढावा मांडला. तर, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी ग्रामीण भागातील संघटनात्मक प्रगती, बूथ रचना आणि कार्यकर्ता विस्तार याबाबतची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर सादर केली. आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने बूथ स्तरापासून संघटन अधिक गतिमान करण्याचा ठाम निर्धार सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

​दिग्गज नेत्यांची मांदियाळी
या महत्त्वपूर्ण बैठकीस आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजितभाऊ देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद देशपांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्या नीताताई केळकर, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, नितीनराजे शिंदे, भगवान साळुंखे, कोल्हापूर पश्चिम जिल्हा प्रभारी पृथ्वीराज पाटील, पुणे जिल्हा प्रभारी शेखर इनामदार, भाजप नेते शरद लाड आणि चिमणभाऊ डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

​तसेच महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ. स्वातीताई खाडे, शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, विलास काळेबाग, विशाल पवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख केदार खाडिलकर, सांगली मनपाचे माजी महापौर धीरज सूर्यवंशी, माजी स्थायी समिती सभापती अतुल माने, माजी गटनेते संदीप आवटी, सांगली जिल्हा परिषद माजी गटनेते आशिष जाधव यांच्यासह सर्व प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, शहर आणि ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.