Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'त्याने कारमध्येच माझ्यावर...' डेप्युटी कलेक्टरचा वासनांध चेहरा उघडा; ३२ वर्षीय पीडितेचा अंगावर काटा आणणारा खुलासा!

'त्याने कारमध्येच माझ्यावर...' डेप्युटी कलेक्टरचा वासनांध चेहरा उघडा; ३२ वर्षीय पीडितेचा अंगावर काटा आणणारा खुलासा!


ज्यांनी कायदा पाळावा, सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा असते तोच जर गुन्हेगार झाला तर? अशीच एक घटना मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्यात घडली. येथील डेप्युटी कलेक्टर अरविंद माहौर यांच्याविरोधात एका 32 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित अधिकाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून दीर्घकाळ आपले शारीरिक शोषण केले आणि नंतर लग्न करण्यास नकार दिला, असा आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, फरार आरोपी अधिकाऱ्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने आपल्या कुटुंबीयांसह पोलीस अधीक्षक धर्मराज मीना यांची भेट घेऊन रीतसर तक्रार दिली होती, ज्याच्या आधारे सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फेसबुकवर ओळख अन् भेटीगाठी

तक्रारीनुसार, वर्ष 2025 च्या सुरुवातीला फेसबुकच्या माध्यमातून पीडित महिलेची ओळख अरविंद माहौर यांच्याशी झाली होती. त्यावेळी माहौर हे सबलगढ येथे एसडीएम पदावर कार्यरत होते. हळूहळू दोघांमधील संवाद वाढला, त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि त्यांच्यात सातत्याने संपर्क सुरू राहिला. याच दरम्यान संशयित अधिकाऱ्याने महिलेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, ज्याला महिलेनेही संमती दिली. लग्नाचे आश्वासन मिळाल्यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी सुरू झाल्या.

फिरायला गेले अन् कारमध्येच
पीडितेने आरोप केला आहे की, 30 मार्च 2025 रोजी आरोपी अधिकारी तिला फिरवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला आणि लग्नाचा विश्वास देऊन कारमध्येच तिच्यावर बलात्कार केला. यानंतर सबलगढ येथील शासकीय निवासस्थानी आणि ग्वाल्हेरमधील एका फ्लॅटवरही तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आले. संशयित अधिकारी सातत्याने लग्नाचे आश्वासन देत राहिल्याने ती त्याच्या संपर्कात राहिली; मात्र जेव्हा तिने लग्नाची तारीख ठरवण्याचा आग्रह धरला, तेव्हा अधिकाऱ्याने स्पष्ट नकार दिला. लग्न करण्यासाठी दबाव टाकला असता, त्याने संबंध स्वीकारण्यास नकार दिलाच, शिवाय पोलिसात तक्रार केल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
शारीरिक शोषणाचे व्हिडिओ

या प्रकरणात पीडितेच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ आहेत, ज्यातून शारीरिक शोषण केल्याचे सिद्ध होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, डेप्युटी कलेक्टर माहौर यांनी लग्नासाठी हुंडा म्हणून 5 कोटी रुपये रोख आणि लग्नाआधी एक महिन्यासाठी मुलीला सोबत पाठवण्याची अजब मागणी केल्याचेही पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, अरविंद माहौर हे यापूर्वीही वादात सापडले होते. सबलगढ येथे तैनात असताना एका वादग्रस्त व्हिडिओमुळे सप्टेंबर 2025 मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते. सध्या पोलीस या प्रकरणातील पुराव्यांची आणि विधानांची तपासणी करत असून पुढील कारवाई सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.