Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रोखठोक वक्तव्य भोवलं की पावला? सीआयडी पोलीस अधीक्षक वैशाली मानेंची बदली अखेर रद्द! वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण...

रोखठोक वक्तव्य भोवलं की पावला? सीआयडी पोलीस अधीक्षक वैशाली मानेंची बदली अखेर रद्द! वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण...

मुंबई : सीआयडीच्या पोलिस अधीक्षक वैशाली माने यांची बदली गृह विभागाने रद्द केली आहे. पोलिस दलातील पुरुषप्रधान मानसिकतेवर बोट ठेवल्यानंतर वैशाली माने यांची बदली रद्द करीत सरकारने त्यांना वेटिंगवर ठेवले आहे.

पोलिस अधीक्षक वैशाली माने यांच्या आरोपानंतर त्यांची बदली रद्द करीत सरकारने त्यांना वेटिंगवर ठेवले आहे. बदलीच्या प्रक्रियेत महिला अधिकाऱ्यांना वारंवार 'साईड पोस्टिंग' दिली जाते यावर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. पोस्टिंग नको, सन्मान द्या, अशी विनवणी सरकारला करीत मी पोस्टिंगसाठी बोलत नाही पण हा मानसन्मानाचा आणि पक्षपातीपणाचा मुद्दा आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

मी कायमस्वरूपी साईड पोस्टिंगला देखील राहू शकते. परंतु, महिला अधिकारी म्हणून अडचणी, भावना आणि अपेक्षांना पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना गांभीर्याने घेतले जावे, अशी विनंती वैशाली माने यांनी सरकारला केली. पोलिस दलातील बदल्यांचे राजकारण, कामाच्या ठिकाणी महिला अधिकाऱ्यांवर होणारा अन्याय आणि पोलिस दलातील पुरुषप्रधान मानसिकता यावर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. पोलिस अधिकारी वैशाली माने यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे येथे पोलिस अधीक्षक (SP) आणि अमरावती येथे पोलिस उपायुक्त (DCP) (मुख्यालय) या पदांवर काम केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.