🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अधिवेशन काळातच गृहखात्याचा मोठा निर्णय; पोलीस दलात खांदेपालट, विश्वास नांगरे पाटलांवर हाय-प्रोफाइल जबाबदारी

अधिवेशन काळातच गृहखात्याचा मोठा निर्णय; पोलीस दलात खांदेपालट, विश्वास नांगरे पाटलांवर हाय-प्रोफाइल जबाबदारी


राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं मंगळवारी(ता.२३) पुन्हा एकदा पोलिस दलात मोठे फेरबदल केले आहेत. यावेळी राज्याच्या गृहविभागानं १२ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. 
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं सर्वाधिक ५२ आयपीएस अधिकारी व ४४ राज्य पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. आता पुन्हा एकदा सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या पावसाळी अधिवेशन काळात बदल्या केल्यामुळे प्रशासनात वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार,राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदावर कार्यरत असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूरचे विद्यमान पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांची अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
महायुती सरकारच्या दुसर्‍या टर्ममध्ये प्रशासकीय पातळीवर मोठी उलथापालथ सुरू आहे.सातत्यानं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात येत आहे. प्रशासनातील वरिष्ठ आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका कायम ठेवल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात सत्तेत परतलेल्या महायुती सरकारच्या या बदल्यांच्या आदेशांमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडताना दिसून येत आहे.

बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे:
१. प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त छ. संभाजीनगर शहर यांची पोलीस उप आयुक्त, डायल ११२, नवी मुंबई

२. निलभ रोहन पोलीस अधीक्षक, हिंगोली पोलीस अधीक्षक, नांदेड

३. अभिनाश कुमार पोलीस अधीक्षक, नांदेड पोलीस उप आयुक्त, पुणे शहर

४. श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक, खामगाव, बुलढाणा पोलीस अधीक्षक, हिंगोली

५. रुपाली अंबुरे पोलीस उप आयुक्त, डायल ११२, नवी मुंबई (बदली आदेशाधीन) पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ

६. शशिकांत सातव पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर पोलीस उप आयुक्त, छ. संभाजीनगर शहर

७. रमेश धुमाळ पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर

८. पीयुष जगताप समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १७ चंद्रपुर अपर पोलीस अधीक्षक, खामगाव, बुलढाणा

९. नारायण शिरगांवकर समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ गडचिरोली समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १९ कुसळगांव, अहिल्यानगर

१०. प्रांजली सोनावणे पोलीस अधीक्षक, गुअवि, अमरावती पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.