Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६;सांगली जिल्ह्यातील ५ तर सातारा जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रांवर होणार मतदान

सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६; सांगली जिल्ह्यातील ५ तर सातारा जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रांवर होणार मतदान

सांगली: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक २०२६ साठी गुरूवार दि, १८ जून २०२६ रोजी सांगली जिल्ह्यातील ५ व सातारा जिल्ह्यातील ७ अशा एकूण १२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान केंद्राचे ठिकाण, ज्या इमारतीत मतदान केंद्र असेल ती इमारत आणि ज्या स्थानिक प्राधिकारीचे मतदार मतदान करण्यास पात्र आहेत, त्या प्राधिकारीचे नाव यांची अनुक्रमे यादी पुढीलप्रमाणे -

सांगली जिल्ह्यातील मतदान केंद्रे

१) कडेगाव - तहसील कार्यालय, कडेगाव, पात्र मतदार - कडेगाव नगरपंचायत, कडेगाव व पलूस नगरपरिषद, पलूस.

२) विटा - उपविभागीय अधिकारी, खानापूर भाग, विटा यांचे कार्यालय, पात्र मतदार - विटा नगरपरिषद, विटा, खानापूर नगरपंचायत, खानापूर, आटपाडी नगरपंचायत, आटपाडी, तासगाव नगरपरिषद, तासगाव.

३) ईश्वरपूर - तहसील कार्यालय, वाळवा, ईश्वरपूर, पात्र मतदार – उरूण ईश्वरपूर नगरपरिषद उरूण ईश्वरपूर, आष्टा नगरपरिषद, आष्टा, शिराळा नगरपंचायत, शिराळा.

४) सांगली - अपर तहसील कार्यालय, सांगली, जुना पुरवठा विभाग, पात्र मतदार - जिल्हा परिषद, सांगली, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका.

५) जत - तहसील कार्यालय, जत, पात्र मतदार - जत नगरपरिषद, जत, कवठेमहांकाळ नगरपंचायत, कवठेमहांकाळ.

सातारा जिल्ह्यातील मतदान केंद्रे
(१) वाई – तहसिल कार्यालय वाई, पात्र मतदार – नगरपरिषद वाई, गिरीस्थान नगरपरिषद महाबळेश्वर, गिरीस्थान नगरपरिषद पाचगणी, नगरपंचायत खंडाळा, नगरपंचायत लोणंद.

(२) फलटण – तहसिल कार्यालय फलटण, पात्र मतदार – नगरपरिषद फलटण.

(३) दहिवडी – तहसिल कार्यालय माण, पात्र मतदार – नगरपंचायत दहिवडी, नगरपंचायत वडूज, नगरपरिषद म्हसवड.

(४) कोरेगांव – तहसिल कार्यालय कोरेगांव, पात्र मतदार – नगरपंचायत कोरेगांव, नगरपरिषद रहिमतपूर.

(५) सातारा – तहसिल कार्यालय सातारा, पात्र मतदार – जिल्हा परिषद सातारा, नगरपरिषद सातारा, नगरपंचायत मेढा.

(६) पाटण – तहसिल कार्यालय पाटण, पात्र मतदार – नगरपंचायत पाटण.

(७) कराड – तहसिल कार्यालय कराड, पात्र मतदार – नगरपरिषद कराड, नगरपंचायत मलकापूर.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.