Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठाकरेंच्या बंडखोर खासदारांचं कुठलंही पत्र नाही! ओम बिर्लांचा मोठा खुलासा, राजकीय वर्तुळात खळबळ

ठाकरेंच्या बंडखोर खासदारांचं कुठलंही पत्र नाही! ओम बिर्लांचा मोठा खुलासा, राजकीय वर्तुळात खळबळ


ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज लोकसभा सचिवालयात बोलावून घेतलं होतं. यावेळी काही महत्वाच्या बाबींचा खुलासा झाला आहे. त्यानुसार, ठाकरेंच्या बंडखोर खासदारांचं कुठलंही पत्र मिळालेलं नाही, असं अध्यक्षांनी सांगितलं. त्याचबरोबर अस असेल तर नेमकी काय कारवाई करता येऊ शकते याबाबत ठाकरेंच्या खासदारांनी आपली भूमिका मांडली तसं आश्वासनही लोकसभा अध्यक्षांनी दिलं आहे. अरविंद सावंत यांनी सांगितलं की, "तुम्हाला माहितीच आहे की, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील आमच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी पक्ष सोडला असून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. अनिल देसाई आणि मी गेल्या आठवड्यात लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि याप्रकरणी अध्यक्षांना विनंतीही केली"

भेटीनंतर केला मोठा दावा

अध्यक्षांच्या भेटीनंतर अरविंद सावंत यांनी म्हटलं की, "पत्रात अध्यक्षांना विनंती करताना आम्ही म्हटलं होतं की, जर कोणी व्यक्ती किंवा खासदार व्यक्तिगतरित्या किंवा गट करुन तुमच्याजवळ येऊन पक्ष सोडण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर तुम्ही संविधानाचं संरक्षण केलं पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. आता या घटनेनंतर आम्ही पुन्हा एकदा एक पत्र पाठवलं होतं, ज्यामध्ये विनंती करण्यात आली की, जर याप्रकरणी काहीही घडतंय तर आधी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, आमचं ऐकल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका. त्याचअनुषंगानं आम्ही अध्यक्षांना विचारलं की, बंडखोर खासदारांकडून तुम्हाला कुठलं पत्र प्राप्त झालं आहे का? त्यावर त्यांनी सांगितलं की, आम्हाला असं कुठलंही पत्र मिळालेलं नाही"

संविधानानुसार निर्णय घेण्याचं आश्वासन
अरविंद सावंत यांनी पुढे सांगितंल की, "आम्ही अध्यक्षांना सांगितलं की, संविधानात जी तरतूद आहे त्याचं संरक्षण करताना या बंडखोरांपैकी एकालाही मान्यता मिळणार नाही. वेगवेगळं बसण्याची देखील व्यवस्था दिली जाऊ नये. या भेटीबाबत अनिल देसाईंनी सांगितलं की, अध्यक्षांनी आम्हाला आश्वासन दिलंय की, याबाबत जो काही निर्णय होईल तो प्रक्रियेनुसारच होईल. याशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट होणार नाही. लोकसभा सचिवालयाकडून आम्ही याप्रकरणाची चौकशी करु, जी व्यवस्था असेल त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ"
काँग्रेसचा बंडखोरांना टोला

दरम्यान, शिवसेनेतील या फुटीबाबत काँग्रेसनं प्रतिक्रिया देताना प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी म्हटलं की, "देशात सध्या अघोषित आणीबाणी सुरु आहे. खासदारांना विकत घेतलं जात आहे. लोकशाहीला कमजोर केलं जात आहे. बंगालमध्ये आपण हेच पाहिलं, जिथं २० खासदार दुसऱ्या पक्षात गेले, हे कसं शक्य आहे. तसंच शिवसेनेच्या सर्व ६ खासदारांनी राजीनामा देऊन भाजपच्या चिन्हावर पुन्हा निवडणूक लढवावी, त्यांनी उघडपणे लढावं, लपून बसू नये. जनतेला दाखवून द्यावं की तुम्ही जिंकू शकता. एका विशिष्ट पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून तुम्ही पक्ष बदलू शकत नाही"



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.