Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निधी मिळाला नाही हा तर शुद्ध खोटेपणा! ठाकरेंच्या 'त्या' ६ बंडखोर खासदारांचा कच्चाचिठ्ठाच बाहेर; दमानियांच्या पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

निधी मिळाला नाही हा तर शुद्ध खोटेपणा! ठाकरेंच्या 'त्या' ६ बंडखोर खासदारांचा कच्चाचिठ्ठाच बाहेर; दमानियांच्या पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!


गेल्या अनेक दिवसापासून राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेलं ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाले. कुठलंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनीच स्वत: याबाबत घोषणा केली. ठाकरेंच्या सहाही फुटीर खासदारांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. तर, हे खासदार खऱ्या शिवसेनेत आलेत असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना डिवचले. तसेच 2022मध्ये शिवसेना वाचवण्यासाठी उठाव केला, त्याचा आता दुसरा टप्पा सुरू केला आहे, असाही टोला शिंदेंनी लगावला आहे. महाराष्ट्रात घडलेल्या सर्वात मोठ्या राजकीय घडामोडीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक खळबजनक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. 
ठाकरेंच्या फुटीर खासदारांबाबत सर्वात धक्कादायक माहिती त्यांनी समोर आणली आहे. ठाकरेंची शिसेना सोडताना बंडखोर खादारांनी पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक कारणे दिली आहेत. यापैकीच एक कारण आहे ते निधी मिळत नसल्याचा दावा. फुटीर खासदारांनी निधी मिळत नसल्याचा आरोप केला आहे. अंजली दमानिया यांनी बंडखोर खासदारांच्या हा आरोप खोटा असल्याचा दावा करणारी माहिती जाहीर केली आहे.
अंजली दमानिया यांंच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये काय आहे?

अंजली दमानिया यांनी एक्स वर पोस्ट शेअर करत खासदारांना मिळणाऱ्या निधीची आकडेवारी जाहीर केली आहे.
खूप खूप खूप धक्कादायक
किती निधी मिळाला
किती खर्च केला
आणि निधी मिळत नाही हे सांगून कसा खोटेपणा केला
वेबसाइटवरील 'एम्पॉवर्ड इंडियन' यांच्याकडील माहिती

2 वर्षांत फुटीर खासदारांना किती निधी मिळाला?

1. ओम राजेनिंबाळकर
एकूण मंजूर निधी : 18.5 कोटी
खर्च केलेला निधी : 1.97 कोटी (10.7%)
पूर्ण झालेली कामे : 130 पैकी 21 (13.9%)
2. नागेश पाटील आष्टीकर

एकूण मंजूर निधी : 19 कोटी
खर्च केलेला निधी : 5.06 कोटी (26.6%)
पूर्ण झालेली कामे : 79 पैकी 28 (26.2%)

3. भाऊसाहेब वाकचौरे
एकूण मंजूर निधी : 14.7 कोटी
खर्च केलेला निधी : 71 लाख (4.9%)
पूर्ण झालेली कामे : 135 पैकी 02 (1.5%)
4. संजय दिना पाटील

एकूण मंजूर निधी : 14.7 कोटी
खर्च केलेला निधी : 15 लाख (1.1%)
पूर्ण झालेली कामे : 40 पैकी 00 (00%)

5. संजय देशमुख
एकूण मंजूर निधी : 18.06 कोटी
खर्च केलेला निधी : 1.42 कोटी (7.6%)
पूर्ण झालेली कामे : 106 पैकी 07 (6.2%)
6. संजय जाधव

एकूण मंजूर निधी : 14.07 कोटी
खर्च केलेला निधी : 3.78 कोटी (25.7%)
पूर्ण झालेली कामे : 56 पैकी 25 (30%)



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.