उद्धव ठाकरेंनाही भारावून टाकलं, केंद्रीय मंत्र्यांनाही आठवले इतिहासातील 'कांबळे'; ... अन् कांबळे ढसाढसा रडला!
शिवसेनेच्या ६० वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कवी नितीन चंदनशिवे यांनी सादर केलेल्या 'आमचा कांबळे' या कवितेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. उद्धव ठाकरेही ही कविता ऐकून भारावून गेले होते. त्यानंतर या कवितेची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही शुक्रवारी इतिहासातील एक कांबळे आठवले.
मंत्री आठवले यांनी सोशल मीडियात याबाबत एक पोस्ट केली आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक कविता पोस्ट करत आठवले यांनी अभिवादन केले आहे. आठवलेंनी म्हटले आहे की, आजचा 'कांबळे' ट्रेंड पाहून इतिहासातील गंगाराम कांबळे आठवले.
अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला एक सामान्य माणूस आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले राजर्षी शाहू महाराज. समतेची ही कथा आजही तेवढीच प्रेरणादायी असल्याचे आठवलेंनी म्हटले आहे. 'एक कांबळे असाही' या कवितेतून त्यांनी गंगाराम कांबळे यांचा संघर्ष आणि शाहू महाराजांची समजेची शिकवण मांडली आहे.
काय आहे कविता?
गंगाधर कांबळे यांना मदत करत शाहू महाराजांनी कशाप्रकारे समतेचा संदेश दिला हे या कवितेतून सांगण्यात आले आहे. महाराजांनी लोकांना समतेचा संदेश दिला, कांबळेतला माणूस दाखवून दिला, मग ब्राम्हण, मराठा सर्वांनी चहा पिला आणि कधीही न रडलेला कांबळे ढसाढसा रडला... असा कवितेचा शेवट करण्यात आला आहे.राजा फक्त सिंहासनावर बसून नाही, तर प्रजेच्या दु:खात सहभागी होऊन मोठा होतो, असेही आठवले यांनी शाहू महाराजांना अभिवादन करताना म्हटले आहे. ही संपूर्ण कविता चंदनशिवे यांच्या कवितेच्या आधारे रचण्यात आली आहे. 'आमचा कांबळे' या कवितेची सोशल मीडियात चर्चा होत असताना आठवलेंनाही मोह आवरला नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.