'त्या' २ गोष्टी खटकल्या अन्...; गर्भश्रीमंत केतनसोबतचं लग्न मोडण्यावर सियाचा ४ दिवसांनंतर थेट धमाका!
केतनच्या दोन गोष्टी खटकल्या, हत्येचं खर कारण समोर
समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी सध्या तुरुंगात आहेत. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी होत असून नवनवे खुलासे होत आहेत. पोलिसांच्या तपासात सियाने केतनच्या दोन गोष्टी तिला खटकत असल्याचा मोठा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी भेट घेतली. केतन अग्रवालच्या हत्येचा तपास आणि खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची विनंती केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली."काही मेडिकल कारणांमुळे केतनला केसांचा छोटासा पॅच होता, मात्र हे सिया आणि तिच्या कुटुंबाला माहिती होते. याबाबत लग्न ठरवण्याच्या अगोदर क्लिअर सांगितलं होते, असं विशाल अग्रवाल म्हणाले. तसेच तिला मान्य नव्हतं तर नकार देणे तिच्यासाठी सोपे होते, यासाठी हत्या करण्याचे काहीच कारण नव्हते. माझ्या मुलाला मारण्याचे कारण काय?" असा संत्तप्त सवाल त्यांनी केला.
"प्लॅनिंगमध्ये आणखी लोकांचा समावेश"
त्याचबरोबर "चेतन आणि सियाचा भाऊ साहिल हे दोघे मित्र आहेत, त्यामुळे त्यालाही त्यांच्या अफेयरबाबत माहिती असावी. तसेच केतनच्या हत्येच्या प्लॅनिंगमध्ये आणखी लोक सहभागी असतील, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, ही केस फास्टट्रॅकमध्ये चालवावी तसेच लवकरात लवकर जे सत्य आहे ते बाहेर यावे तसेच जे आरोपी आहे त्याला आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आहे तसेच मी स्वतः लक्ष देणार असं आश्वासन दिल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.