Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ॲम्ब्युलन्सच्या हेडलाईटमध्ये पोस्टमार्टम! नांदेडमधील 'या' सरकारी डॉक्टरवर मोठी कारवाई

ॲम्ब्युलन्सच्या हेडलाईटमध्ये पोस्टमार्टम! नांदेडमधील 'या' सरकारी डॉक्टरवर मोठी कारवाई


नायगाव: नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मागील पंधरवड्यात खासगी ॲम्ब्युलन्सच्या हेडलाईट प्रकाशझोकात शवविच्छेदन करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालानुसार शवविच्छेदन करणारे डॉ. मोतेचिन कादर यांची सेवा समाप्ती करण्यात आली. ही कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केली.

काही दिवसांपूर्वी टेंभुर्णी (नायगाव) येथील वीरभद्र मारोती वडजे यांचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. पण, शवविच्छेदनगृहात विद्युत पुरवठा कार्यान्वित नसल्याकारणाने खासगी ॲम्ब्युलन्स हेडलाइट प्रकाशझोकात डॉ. कादरी यांनी शवविच्छेदन केले होते. याप्रकरणी 'सकाळ'मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन पेरके यांनी घेतली होती.
एक त्रिसदस्यीय समिती डॉ. गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती, या समितीने नायगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन सखोल चौकशी करून अहवाल डॉ. सचिन पेरके यांना दिला, यात समितीने डॉ. कादरी यांच्यावर ठपका ठेवला. वीजपुरवठा उपलब्ध नसताना व सूर्यास्तानंतर मार्गदर्शन सूचनांचे पालन न करणे, वरिष्ठांची परवानगी न घेता शवविच्छेदन करणे, शिस्तीचा भंग करणे व कर्तव्यात कसूर या बाबी डॉ. कादरी यांनी पाळल्या नसल्याचा ठपका ठेवण्यात आला.
डॉ. कादरी हे नायगाव येथे कंत्राटी म्हणून कार्यरत होते. आता चौकशी अहवाल प्राप्त झाला, त्यानुसार त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. -डॉ. सचिन पेरके, जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड चौकशी समितीने डॉ. कादरी यांच्यावर आरोग्य विभागाचे नियम तसेच मार्गदर्शन सूचनांचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला असून सेवा समाप्तीचे आदेश प्राप्त झाले आहेत. -डॉ. अर्पणा पुपूलवाड, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, नायगाव



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.