"सांगलीकरांनो, आजचा बेत ठरला! संकष्टीच्या निमित्ताने 'म.. म.. मसूरा'मध्ये रंगणार पनीर अन् काजू मसाल्याची जुगलबंदी!"
सांगलीतील खवय्यांचे हक्काचे आणि आवडीचे ठिकाण म्हणजे उत्तर शिवाजी नगर येथील 'म.. म.. मसूरा'! जिथे पाऊल ठेवताच खवय्यांची नेहमीच वरदळ पाहायला मिळते. इथल्या प्रत्येक पदार्थाची चवच न्यारी आहे. पण आजचा दिवस सांगलीकर खवय्यांसाठी अधिकच खास असणार आहे, कारण आज आहे संकष्टी चतुर्थी! या खास निमित्ताने 'म.. म.. मसूरा'मध्ये नेहमीच्या प्रसिद्ध मसूराच्या विविध प्रकारांसोबतच, खास बेत म्हणून पनीर मसाला, काजू पनीर मसाला आणि काजू मसाला हे जिभेवर रेंगाळणारे पदार्थ खास तयार करण्यात आले आहेत. काहीतरी वेगळा आणि तृप्त करणारा आनंद लुटण्यासाठी खवय्यांनी येथे आवर्जून यायलाच हवे, असा हा बेत आहे.
खास आदरातिथ्य आणि जम्बो रोटीचा नाद!
'म.. म.. मसूरा'मध्ये तुमचे आगमन होताच प्रसन्न वातावरणात तुमचे आदरातिथ्य केले जाते. येथील शांत, निवांत आणि ऐसपैस बैठक व्यवस्था मनाला भुरळ पाडते. तुम्ही ऑर्डर दिली की अवघ्या १० ते १५ मिनिटांत गरमागरम पदार्थ तुमच्या टेबलवर हजर होतात. त्यातही येथील 'जम्बो रोटी'चा नादच काही वेगळा आहे, जी या पदार्थांची चव दुप्पट करते. आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने रात्रीच्या जेवणाचा आनंद द्विगुणित करायचा असेल, तर मग 'म.. म... मसूरा'ला भेट द्यावीच लागेल!पत्ता: उत्तर शिवाजी नगर, लिंगायत बोर्डिंग समोर, सांगली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.