Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिसांचा दणका! सांगलीत लहान मुलाची थरारक हत्या करणारा कुख्यात गुंड निलेश गडदे गजाआड; मैत्रिणीसोबत लॉजमध्ये लपला होता नराधम

पोलिसांचा दणका! सांगलीत लहान मुलाची थरारक हत्या करणारा कुख्यात गुंड निलेश गडदे गजाआड; मैत्रिणीसोबत लॉजमध्ये लपला होता नराधम


सांगलीत लहान मुलाचा गोळ्या झाडून खून करणाऱ्या गुंड निलेश गडदेच्या मुसक्या आवळल्या! कर्नाटक सीमेवरील लॉजमधून पोलिसांनी मुसक्या बांधल्या. सांगलीला हादरवून सोडणाऱ्या हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू चिमुरडा वेदांत बंडगर याच्या हत्येचा मुख्य सूत्रधार, कुख्यात गुंड नीलेश विठोबा गडदे याच्या पोलिसांनी आज अत्यंत थरारक कारवाई करत मुसक्या आवळल्या आहेत. कर्नाटक सीमा भागात एका लॉजवर मैत्रिणीसोबत मौजमजा करत लपून बसलेल्या गडदेला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या  पथकाने अचूक सापळा रचून दस्तऐवज केले. या क्रूर हत्याकांडात सामील असलेले अन्य तिघे नराधम अजूनही फरार असून, पोलीस त्यांचा जंगजंग पछाडून शोध घेत आहेत.
रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामाच्या वादातून खरात आणि गडदे या दोन गटांत टोकाचा संघर्ष पेटला होता. या कामाचा ठेका लक्ष्मण खरात यांच्याकडे असल्याने, खरात यांनी हे काम सोडावे यासाठी संशयित नीलेश गडदे सातत्याने दबाव आणत होता. या वादातूनच बुधवारी रात्री गडदे दोन साथीदारांसह खरात यांच्या घरात घुसला. खरात घरी नसल्याचे पाहून त्याने त्यांच्या पत्नीला थेट बंदूक दाखवून धमकावले आणि खंडणीची मागणी केली.
खरात यांच्या घरात घुसून दहशत माजवल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे धावून गेले. गडदे याच्या गुंडगिरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी शेकडो हमाल जमा झाले होते. याच दरम्यान पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन्ही गट आमनेसामने आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या चारचाकीवर जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीमुळे गुंड निलेश गडदेचा थरकाप उडाला आणि तो सूडाने पेटला.

​बाळासाहेब बंडगर यांचा काटा काढण्यासाठी गडदे थेट सांगलीत दाखल झाला. मात्र, बंडगर यांच्या घराबाहेर अंगणात मोबाईल पाहत बसलेल्या निष्पाप वेदांतवर त्याने थेट गोळ्या झाडल्या. या अंगावर काटा आणणाऱ्या गोळीबारात निष्पाप वेदांतचा जागीच मृत्यू झाला. या क्रूर गुन्ह्याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद आहे.
​गुन्हा केल्यापासून संशयित निलेश गडदे पोलिसांना सलग गुंगारा देत होता. त्याच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली होती. अखेर तो कर्नाटक सीमा भागातील एका लॉजवर लपल्याची गुप्त माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास लॉजवर धाड टाकून त्याला ताब्यात घेतले आणि रात्री उशीरा त्याला सांगलीत आणण्यात आले. आता या नराधमाला पोलीस खाकीचा इंगा दाखवणार आहेत.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.