सांगली : पेट्रो केमिकलचा व्यवसाय असणाऱ्या माजी नगरसेवक अरूण रामचंद्र मोरे (वय ५९, रा. स्टेशन चौक, सांगली) यांची व्यवसायात नऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संशयित प्रकाश गणपती जगताप (रा.नंदगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर), सिद्धिकी मानूर (रा. स्वप्ना व्हिला, कामरेज रस्ता,सुरत) आणि प्रकाश आहीर -दोशी (रा. नसिरनगर, करटगम, जि. सुरत) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माजी नगरसेवक अरुण मोरे यांचे यश पेट्रो केमिकल्स नावाने दुकान आहे. त्यांना संशयित प्रकाश जगताप याने फाल्कन ग्रुप ऑफ कंपनीच्या मालकांशी चांगली ओळख असल्याचे सांगून कमी किमतीत मिक्स हायड्रो कार्बन (एमएचओ) मिळवून देतो असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मोरे यांनी फाल्कन ग्रुप ऑफ कंपनीचे मालक सिद्धीकी मानूर यांच्या खात्यावर सहा लाख रुपये ऑनलाइन पाठविले. तसेच संशयित प्रकाश जगताप यांना रोख ३ लाख रुपये दिले. हा व्यवहार दि. २५ ऑक्टोबर २०२५ पासून दि. १२ जुलै २०२६ पर्यत सुरू होता.संशयितांना पैसे दिल्यानंतर देखील संशयितांनी मोरे यांना इंडस्ट्रियल फ्युएल पुरवले नाही. तसेच नऊ लाख रुपये देखील परत केले नाहीत. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे मोरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शनिवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.