Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत जनतेचा खोळंबा, अन् नगरसेवकांचा गोव्यात ‘धुमाकूळ’! अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले गडी गॅसबत्ती सोडून कंदिलाच्या उजेडात हरखून टूुम्म!!​

सांगलीत जनतेचा खोळंबा, अन् नगरसेवकांचा गोव्यात ‘धुमाकूळ’! अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले गडी गॅसबत्ती सोडून कंदिलाच्या उजेडात हरखून टूम्म!!


सांगली :- इथं सांगलीत पाऊस-पाण्याच्या दिवसात जनतेचे प्रश्न, रस्ते, गटारी आणि पाण्याचा पुरवठा वाऱ्यावर सोडून आपले सांगलीतले भाजपचे नगरसेवक थेट गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर 'लय भारी' ट्रिप एन्जॉय करायला गेलेत.
​इथं जनता नगरसेवकांच्या नावानं खडे फोडतीय, पाण्यासाठी आणि नागरी समस्यांसाठी पालिकेच्या चक्रा मारून मारून लोकांच्या पायाला फोड आलेत, पण तिकडं गोव्याच्या थंड हवेत आपल्या लोकप्रतिनिधींना जनतेच्या या त्रासाचा पुरता विसर पडल्याचं दिसतंय.
​अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले गडी हरकून तुम्म!

​अहो, राजकारणात काय चार दिवस थोडे बरे आले, पद मिळालं, की काही जणांना आभाळ ठेंगणं होतंय. तसंच काहीसं या नगरसेवकांचं झालंय. "अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले" आणि लगेच हवेत उडायला लागले, अशीच चर्चा सध्या सांगलीच्या कट्ट्या-कट्ट्यांवर रंगली आहे. स्वतःला लय मोठे समजणारे हे गडी गोव्याच्या किनाऱ्यावर जाऊन असे काही हरकून 'तुम्म' झालेत, की त्यांना सांगलीची आणि त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांची अजिबात आठवण उरलेली नाही.

​गॅसबत्ती बरोबर कंदीलही गेले..!
​सगळ्यात मोठी मज्जा म्हणजे, जे नगरसेवक स्वतःला प्रभागाचे 'गॅसबत्ती' (म्हणजे मोठे नेते) समजतात, ते तर गेलेच आहेत; पण त्यांच्या मागे-मागे फिरणारे छोटे-मोठे 'कंदील' (कार्यकर्ते आणि चमचे) सुद्धा या ट्रिपमध्ये सामील झालेत! आता गॅसबत्तीच्या उजेडात हे कंदील गोव्यात काय दिवे लावणार, हे देवच जाणे.
"आम्ही मतदान करून यांना नगरसेवक बनवलं ते आमच्या अडचणी सोडवायला, की गोव्यात जाऊन गाड्या उडवायला? गावात साधे गटारीचे प्रश्न सुटेनात आणि आमचे लोकप्रतिनिधी तिकडं समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी काढण्यात व्यस्त आहेत!"
थोडक्यात काय तर...

सांगलीची जनता सध्या वाऱ्यावर आणि नगरसेवक मात्र गोव्याच्या किनाऱ्यावर 'फुल टू' मजेत आहेत. आता ही 'लय भारी' ट्रिप संपवून जेव्हा हे गडी परत सांगलीत पाय ठेवतील, तेव्हा जनता यांना कंदिलाचा उजेड दाखवून जाब विचारणार की गॅसबत्तीच्या उजेडात यांचा सत्कार करणार, हे येणारा काळच ठरवेल!




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.