Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधान परिषद निवडणूक २०२६: मतदान आणि मतमोजणीच्या तयारीचा आढावा; उमेदवार प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली

विधान परिषद निवडणूक २०२६: मतदान आणि मतमोजणीच्या तयारीचा आढावा; उमेदवार प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली


सांगली : सांगली सह सातारा विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक-2026 अंतर्गत येत्या 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर मतमोजणी 22 जून 2026 रोजी होणार आहे. या अनुषंगाने उमेदवार / उमेदवार प्रतिनिधी यांना मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा सांगली सह सातारा विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक-2026 चे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप यांच्यासह उमेदवार / उमेदवार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. उमदेवारांनी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधींची नियुक्ती करावी. त्याचबरोबर मतमोजणीसाठीही प्रत्येक मतमोजणी टेबलसाठी प्रतिनिधीची नियुक्ती करावी. मतदान प्रक्रियेदरम्यान गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. मतदान केंद्रात मोबाईल किंवा तत्सम अन्य उपकरणे जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सर्व मतदान केंद्राचे वेबकास्टींग होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

मतदानाची योग्य पद्धत, वैध आणि अवैध मतदान याबाबत स्पष्ट मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे निरसन केले. तसेच मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान व मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे व उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप यांनीही मतदान व मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.