Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंढे साहेब, बाहेर स्टंटबाजी करण्यापेक्षा आधी आतलं बघा! आमदार अभिजीत पाटलांचा तुकाराम मुंढेंवर थेट हल्ला; भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले!

मुंढे साहेब, बाहेर स्टंटबाजी करण्यापेक्षा आधी आतलं बघा! आमदार अभिजीत पाटलांचा तुकाराम मुंढेंवर थेट हल्ला; भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले!

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून धडाधड कारवाया सुरू आहेत. भेसळ आणि भेसळखोरांविरोधात त्यांनी कायद्याचा बडगा उगारल्याने जनतेकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावर सुरू आहे.

नागरिकांच्या आरोग्यांशी खेळणाऱ्यांविरोधात ते धाडसी कारवाई करत असल्याने अनेकांनी त्यांची आता बदली करू नका अशी सरकारकडे मागणी केली आहे. त्याचवेळी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी तुकाराम मुंढे यांना आरसा दाखवला आहे. त्यांच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

बाहेर जाऊन धाड टाकण्यापेक्षा

तुकाराम मुंडेनी बाहेर जाऊन धाडी मारण्यापेक्षा अगोदर त्यांनी त्यांच्या खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना बडतर्फ करून घाण काढून अगोदर विभाग स्वच्छ करावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेले प्रशांत कुचेकर, इलागे हे औषध प्रशासनातले दोन अधिकारी गुटख्याचे रॅकेट चालवतात. कुचेकर यांच्यावर सोलापूर मध्ये असताना गुटखा तस्करीचा गुन्हा दाखल असून इलागे यांच्या स्वत:च्या गाडीत तर ३ कोटी ४२ लाखाची कॅश सापडली असा गंभीर आरोप माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी केला. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली असून आता तुकाराम मुंढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

सरकारवरही साधला निशाणा

प्रशांत कुचेकर आणि इलागे या दोघाचा विषय सभागृहात मांडलाय तर दोघा अधिकार्‍यावर केवळ शिस्तभंगाची कारवाई केली. सरकारचा मला खेद वाटतो ..सभागृहात या दोघांविषयी सगळी माहिती देऊन फक्त शिस्तभंगाची कारवाई केली. थेट या दोघांना बडतर्फ करण्याची गरज होती अशी अपेक्षा आमदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली. अशी कारवाई केली तरच औषध प्रशासन स्वच्छ होईल, असे ते म्हणाले.

धाड टाकण्यापूर्वीच अधिकाऱ्यांकडून फोन

अशोक गुप्ता हा महाराष्ट्रात गुटख्याचे रॅकेट( पोहच करणारा) चालवणारा व्यक्ति असून रॅकेटची साखळी राबवत आहे. पथक धाडी टाकण्याला जाण्या अगोदर देखील या विभागातील अधीकारी गुटखा तस्करांना फोन करुन माहिती देत आहेत .कोट्यावधीचा माल लाख रुपयाचा दाखवला जातो. गुटखा रॅकेट कसे चालते याची सगळी माहिती तुकाराम मुंडेना भेटून दिली आहे. १०० रुपयाला १० मिळणाऱ्या गुटख्याच्या पुड्या आता मुंडे यांच्या धास्ती मुळे आता १०० रुपयात ३ मिळत आहेत, असा दावा पाटील यांनी केला.

कुणीही फुटणार नाही

ऑपरेशन तुतारीवरही आमदार अभिजीत पाटील यांनी मत व्यक्त केले. मी मविआ बैठकीत होतो उद्धव ठाकरेच्या स्नेह भोजन घेऊन आलो मी बैठकीला दांडी मारल्याच्या चुकीच्या बातम्या समोर आल्या. शरद पवारांनी सांगितले आहे.त्या प्रमाणे एक ही जण पक्षातून जाणार नाही, असा दावा त्यांनी व्यक्त केला. तर विश्वास नागरे पाटील यांनी संघाशीसंबंधीत कार्यक्रमाला हजेरी लावल्याप्रकरणी त्यांनी टीका केली. प्रशासनातील अधिकाऱ्याचा कोणताच पक्ष नसतो. त्यांनी अधिकारी होताना घेतलेल्या शपथेचं स्मरण ठेऊन निःपक्षपाती भूमिका घेणे आवश्यक होती. कुणा एकाची बाजू घेणे चुकीचे असल्याचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.