मुंबई : तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त झाल्यापासून राज्यातील नाही तर देशभरातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. मुंढेंच्या धडाकेबाज कामगिरीचे एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र माफियांकडून त्यांना पदावरून हटवण्यासाठी मोठा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार यांनी खळबळजनक दावा केला आहे. तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी इंटरनॅशल ड्रग लॉबी धडपड करत असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवाईनंतर चर्चेत असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत आज विधानसभेत चर्चा झाली. या वेळी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एफडीए संध्या चांगली कारवाई करत आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा प्रश्नच येत नाही. मात्र अधिकाऱ्यांकडे चांगली वाहने, कार्यालय नाहीत. वाहनांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. अधिकाऱ्यांसाठी चांगल्या वाहनांची व्यवस्था केली जाणार असल्याची त्यांनी विधानसभेत सांगितले.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड म्हणाले, तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर भेसळखोरांचे अनेक अवैध धंदे बंद पडले आहे. त्यामुळे मोठ मोठ्या ड्रग्ज लॉबी, मेडिकल कंपन्या एकत्र येत तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी प्रयत्न करत आहे. एवढच नाही तर तुकाराम मुंढेंची बदली व्हावी यासाठी तब्बल 250 कोटी सुपारी घेतली आहे. एवढच नाही तर यामध्ये मोठी नावं असून मी लवकरच जाहीर करणार आहेत. एवढच नाही तर अन्न व प्रशासन विभाग झिरवळ चालवत नसून ते आणखी कोणीतरी चालवत आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीमुळे त्यांची विकेट काढायला 250 कोटी रुपये जमा केले जात. यामागे एक मोठी लॉबी काम करत असून त्यांचा गोप्यस्फोट मी करणाप आहे. यामध्ये कोण आहे तसेच लॅबमध्ये गेले की फेल होते, सेटलमेंट केली जाते.
तुकाराम मुंढे यांच्या जीवाला धोका
तुकाराम मुंढे यांच्यातील टी हा टायगरमधील टी झाला आहे. ते चांगले काम करतायत, तर त्यांना तीन वर्षे ठेवले पाहिजे असे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.