Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बँकेत भरण्यासाठी दिलेले ३० लाख घेऊन कर्मचाऱ्याचा पोबारा, सांगलीतील घटना

बँकेत भरण्यासाठी दिलेले ३० लाख घेऊन कर्मचाऱ्याचा पोबारा, सांगलीतील घटना


सांगली : शहरातील एका व्यावसायिकाने बँकेत भरणा करण्यासाठी दिलेले ३० लाख रुपये घेऊन त्यांच्या स्वीय सहायकाने पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महंमद हसन रफिक पिरजादे (वय ३२, रा.न्यू रेल्वे पोलिस लाइन, स्टेशन रस्ता, मिरज) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सचिन शशिकांत मालू (रा. म. गांधी रस्ता, जयसिंगपूर, ता. शिरोळ. सध्या रा. आनंद चिंतामणी सोसायटी, फ्लॅट क्र. ४०१, ओंकार बिल्डिंग, धामणी रस्ता, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती अशी, समृद्धी बिल्डिंग सिस्टीम या कंपनीत फिर्यादी सचिन मालू हे संचालक म्हणून कार्यरत आहेत, तर संशयित महमंद पिरजादे हा त्यांच्याकडे कामगार व स्वीय सहायक म्हणून काम करतो.

मालू यांनी दि. १६ जून रोजी सकाळी १० च्या सुमारास संशयित महंमद पिरजादे याच्याकडे कंपनीच्या व्यवहाराचे ३० लाख रुपये बँकेत भरण्यासाठी दिले होते. मात्र, पिरजादे याने ही रक्कम बँकेत भरली नाही. परस्पर ती रक्कम स्वत:च्या आर्थिक लाभासाठी वापरली. हा प्रकार निदर्शनास येताच मालू यांनी संशयित पिरजादे याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी पिरजादे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.