Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाचखोर खाकीवर 'एसीबी'चा सर्जिकल स्ट्राईक! जतमध्ये १ लाख ६० हजारांच्या लाचप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटलावर गुन्हा दाखल!

लाचखोर खाकीवर 'एसीबी'चा सर्जिकल स्ट्राईक! जतमध्ये १ लाख ६० हजारांच्या लाचप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटलावर गुन्हा दाखल!


जत पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आणि लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती देणाऱ्या पोलीस पाटलाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने सांगली जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. भाऊ आणि पुतण्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सुरुवातीला दोन लाख रुपयांची लाच मागून, तडजोडीअंती १,६०,००० रुपयांची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम विठ्ठल घोदे (वय ४०, ब.नं. १०९६, नेमणूक: जत पोलीस ठाणे) आणि काशीराम कृष्णा माने (वय २६, पोलीस पाटील, सिद्धनाथ गाव, ता. जत) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमके प्रकरण काय?

२७ वर्षीय तक्रारदाराच्या भाऊ आणि पुतण्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम घोदे याने आपल्या पदाचा गैरवापर केला. घोदे याने सुरुवातीला २ लाख रुपयांची लाच मागितली होती. अखेर तडजोडीनंतर १ लाख ६० हजार रुपये देण्याचे ठरले. घोदे याने ही लाचेची रक्कम मुचुंडी गावाजवळील आर. आर. ढाब्यापाशी सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील काशीराम माने यांच्याकडे देण्यास सांगितले होते.

​पोलीस पाटील काशीराम माने याने सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवली आणि तक्रारदाराला विक्रम घोदे यांना पैसे देण्यास प्रोत्साहन दिले. तसेच घोदेच्या सांगण्यावरून लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला.

एसीबीची धडक कारवाई:
तक्रारदाराच्या अर्जावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली युनिटने २० एप्रिल २०२६ रोजी पडताळणी कारवाई केली होती. यामध्ये लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर आज, ३० जून २०२६ रोजी जत पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ही धडक कारवाई सांगली एसीबीच्या पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, अंमलदार प्रितम चौगुले, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार व सहकाऱ्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.