चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना! चिमुरड्यांची शाळा ठरली अखेरची; झाड कोसळून एकाचा जागीच मृत्यू, १० निष्पाप जीव जखमी
मुंबईतील चेंबूर भागातून एक थरकाप उडवणारी मोठी दुर्घटना घडली आहे. चेंबूर येथील 11 नंबर रोडवर एका धावत्या शाळेच्या बसवर अचानक एक झाड कोसळलं आहे. या भीषण अपघाताच्या वेळी बसमध्ये अनेक शाळकरी मुले होती. झाड कोसळल्यामुळे बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. बसमधील १० विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यातील एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही दुर्घटना घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जखमी मुलांना बाहेर काढण्यात यश आले असले, , तरीही एक शाळकरी मुलगा अजूनही बसमध्येच अडकल्याची माहिती आहे.. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. बसची अस्वस्था पाहून या दुर्घटनेची दाहकता जाणवतेय. अंगावर काटा आणणारे हे दृश्य असून सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. ही बस चेंबूर टिळक नगर युनिव्हर्सल स्कूलची होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.