Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उपसभापती पदासाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला! शिंदेंचा ठाकरेंना सर्वात मोठा धक्का

उपसभापती पदासाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला! शिंदेंचा ठाकरेंना सर्वात मोठा धक्का


राज्याच्या राजकारणातून आणखी एक सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतीपदी पदासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला हा सर्वात मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराला विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी देऊन ठाकरेंना पुन्हा एकदा जोर का झटका दिला आहे.
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय तसेच विश्वासू आमदार म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून त्यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. सचिन अहिर यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाने एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा शह दिल्याची चर्चा आहे.


उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नाराज नेत्यांना हेरून त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश देण्याचा झपाटा एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच्या दीड वर्षांनी ऑपरेशन टायगर राबवून सहा खासदारांना गळाला लावण्याची किमया एकनाथ शिंदे यांनी साधली. त्यानंतर आता पुढचा टप्पा 'आमदारांचा प्रवेश' असे खुलेआमपणे एकनाथ शिंदे यांच्या वतीने सांगण्यात आले. ठाकरे फुटीरांच्या मतदारसंघात जाऊन तोंडसुख घेत असताना इकडे मुंबईत आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ ज्यांच्यामुळे सेफ होता, त्याच सचिन अहिर यांना फोडून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे.

सचिन अहिर यांना उपसभापतीपदाची उमेदवारी

विधान परिषदेचे सभापतीपद भाजपकडे असल्याने उपसभापतीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार असल्याचे निश्चित होते. त्यासाठी नीलम गोऱ्हे, मनिषआ कायंदे, कृपाल तुमाने अशा दिग्गजांची नावे चर्चेत होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना फोडून रातोरात निवडणुकीची गणिते बदलून टाकली. सचिन अहिर यांच्या अधिकृत प्रक्षप्रवेशाआधी त्यांना उपसभापतीपदाची उमेदवारी दिली. त्यांचा अर्ज भरण्यासाठी नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, मनिषा कायंदे उपस्थित होत्या.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.