भाडेकरुंवर घरमालकांची मनमानी चालणार नाही; भाडेवाढ, बेदखल करण्याच्या कायद्याविषयी सर्वकाही जाणून घ्या
तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा भाड्याने राहायचा विचार करत असाल, तर केवळ भाडं आणि ठिकाण पाहणे पुरेसे नाही. लेखी करार, ऑनलाइन नोंदणी, सिक्युरिटी डिपॉझिट, भाडेवाढीचे नियम, दुरुस्तीची जबाबदारी, घर खाली करायची प्रक्रिया आणि KYC म्हणजे पोलीस पडताळणी यांसारख्या गोष्टींची माहिती सर्वसामान्यांना माहिती असली पाहिजे.
आपल्या देशात बहुतेक लोक वेगवेगळ्या शहरात भाड्याच्या घरात राहतात पण, फारच कमी भाडेकरूंना त्यांचे संरक्षण करणारे अनेक हक्क आणि नियमांबद्दल माहिती असते. अनेक राज्यांनी भाड्याच्या घरांसंबंधीच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे, तुम्ही भाड्याने दुसऱ्या शहरात किंवा राज्यात राहण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या नियमांची माहिती असायला हवी.भाड्याच्या घराचा लिखित करार कराघर किंवा फ्लॅट भाड्याने घेताना केवळ वाटाघाटींवर अवलंबून राहू नका. भाड्याची रक्कम, सिक्युरिटी डिपॉझिट, नोटीस कालावधी आणि अशा सर्व अटी लेखी करारात नमूद करण्याची खात्री केली पाहिजे. यामुळे भविष्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास दोन्ही पक्षांकडे स्पष्ट नोंद असेल. अनेक राज्यांमध्ये आता डिजिटल भाडे करार नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे. यामुळे भाडेकरार करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक झाली आहे, पण सर्वच राज्यांमध्ये याबद्दल नियम एकसमान नाही. त्यामुळे घर खरेदी करण्यापूर्वी तुमच्या राज्यात नोंदणी अनिवार्य आहे की नाही याची खात्री करा.
भाडेकरूंसाठी अनेकदा सिक्युरिटी डिपॉझिट मोठ्या चिंतेची बाब असते तर, बहुतेक प्रकरणांमध्ये घरमालक अनेक महिन्यांचा ॲडव्हान्स देखील मागतात. त्यामळे घर किंवा फ्लॅट खरेदीपूर्वी तुमच्या परिसरातील ॲक्च्युअल सिक्युरिटी डिपॉझिट आणि मागितलेली रक्कम योग्य आहे की नाही हे समजून घ्या. भविष्यात भाडेवाढ किती केली जाईल आणि केव्हा भाडेवाढ केली जाईल, याबाबत अटी सुरुवातीलाच स्पष्ट करा. अशाप्रकारच्या सर्व माहिती करारामध्ये लिहिल्यास भविष्यात अचानक होणाऱ्या भाडेवाढीवरून वाद होण्याची शक्यता कमी होते.
घरातील कोणत्याही समस्या किंवा दुरुस्ती कामांमुळे अनेकदा घरमालक आणि भाडेकरूंमध्ये मतभेद निर्माण होतात. त्यामुळे, छोटछोट्या दुरुस्ती कोण करणार आणि मोठ्या कामांची जबाबदारी कोणावर असेल, याबाबत आधीच निर्णय घ्या ज्यामुळे भविष्यातील वाद टाळता येऊ शकतात. घरमालक कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय भाडेकरूला तात्काळ घर किंवा फ्लॅट सोडून जायला सांगू शकत नाही. तसेच भाडे करारात भाडेकरूने अटींचे पालन करून वेळेवर घर खाली केले पाहिजे. दोन्ही पक्षांनी कायदेशीर प्रक्रियेचा आदर केला पाहिजे.
आपल्या घरी भाडेकरू ठेवण्याआधी बहुतेक शहरांमध्ये पोलीस पडताळणी अनिवार्य केली गेली आहे. भाडेकरूंचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर ओळखपत्रे देखील पोलिसांकडे जमा केले पाहिजे जेणेकरून सुरक्षितता वाढते आणि भविष्यातील कायदेशीर अडचणींची शक्यता कमी होते. अशा स्थितीत, घर भाड्याने घेण्यापूर्वी केवळ भाडे आणि ठिकाणाचा विचार करणं पुरेसं नाही. भाडे करार, सिक्युरिटी डिपॉझिट, नोंदणी, दुरुस्ती आणि कायदेशीर नियम यांसारख्या घटकांचा विचार केला पाहिजे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.