Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

BREAKING: डॉ. रमाकांत टेके बॅकफूटवर! जिल्हाधिकाऱ्यांच्या एकाच आदेशाने विश्रामबाग पोलिसांची थरारक कारवाई, वाढीव कलम दाखल!

BREAKING: डॉ. रमाकांत टेके बॅकफूटवर! जिल्हाधिकाऱ्यांच्या एकाच आदेशाने विश्रामबाग पोलिसांची थरारक कारवाई, वाढीव कलम दाखल!


सांगली शहरातील टेके आय क्लिनिक येथे रुग्णांचे लॅबोरेटरी रिपोर्ट टेक्निशियन तयार करून स्वतःच्या सहीने देत होते. ३ महिन्यांपूर्वी एका रुग्णाचा चुकीचा एच. आय. व्ही. पॉझिटिव्ह रिपोर्ट टेक्निशियनच्या सहीने दिला व एच. आय. व्ही.पॉझिटिव्ह हे कारण देऊन रुग्णाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया नाकारली. टेक्निशियनने पॅथॉलॉजिस्टशिवाय स्वतः रिपोर्ट देणे हा बोगस वैद्यक व्यवसाय ठरतो. डॉ. रमाकांत टेके व तंत्रज्ञ यांच्यावर बोगस डॉक्टर म्हणून गुन्हे दाखल करण्याचे निवेदन कृष्णा साठे यांनी दिले होते.

त्यानुसार हा आदेश देण्यात आला. पत्रकार परिषदेत कृष्णा साठे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टर शोध समितीच्या बैठकित संबंधितांवर बोगस डॉक्टर म्हणून गुन्हे दाखल करण्याचे आदेश मनपा आरोग्य अधिकारी यांना दिले होते. परंतु, विश्रामबाग पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांनी १९ एप्रिल रोजी टेके आय हॉस्पिटलमधील तंत्रज्ञ व डॉक्टर यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा नोंद केला व बोगस डॉक्टर सारख्या गंभीर गुन्ह्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचे हे षडयंत्र कृष्णा साठे यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हाधिकारी यांनी पुन्हा स्पष्ट आदेश दिले, अखेर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट १९६१ कलम ३३, बी. एन. एस. ३(५), ३१६(२), ३१८(४) इत्यादी कलमवाढ करण्यात आला. महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक अधिनियम १९६१ मधील तरतुदींचे उल्लंघन हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. बैठकीमध्ये काही पॅथॉलॉजिस्ट लॅबोरेटरीमध्ये स्वतः हजर न रहाता त्यांच्या छापील सह्यांचा वापर रिपोर्टवर केला जातो व रुग्णांची फसवणूक केली जाते. यातील बहुतेक पॅथॉलॉजिस्ट वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापक म्हणून पूर्णवेळ काम करत असतात याबाबत चर्चा झाली.
याबाबत माहिती घेऊन अनुपस्थितीत छापील सह्या केल्याचे आढळल्यास त्या पॅथॉलॉजिस्टवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय, सांगली व प्रकाश मेमोरियल वैद्यकीय महाविद्यालय, ईश्वरपूर येथील पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी व बायोकेमिस्ट्री विभागातील अध्यापकांची माहिती मागविण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक, मनपा आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये लॅबोरेटरीचे सर्वेक्षण करून पॅथॉलॉजिस्टच्या अनुपस्थितीत छापील सह्या देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

डॉक्टरला पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्न
तक्रारदार कृष्णा साठे यांनी आरोप केला आहे की, बोगस डॉक्टर सारख्या गंभीर गुन्ह्यातून वाचवण्याचा प्रयत्न पोलीस निरीक्षकांनी केला. पोलिसांचे हे षडयंत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र वैद्यकीय सेवा कायद्यानुसार, हलगर्जीपणाच्या वाचवण्यासाठी दाखल गुन्ह्यात बोगस डॉक्टर म्हणून कलम वाढवण्याचे आदेश दिले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.