Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या कारचा भीषण अपघात; 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती', एअरबॅगमुळे वाचले प्राण!

आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या कारचा भीषण अपघात; 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती', एअरबॅगमुळे वाचले प्राण!


सांगली विधानसभेचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या गाडीला रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. उगार येथून सांगलीकडे परतत असताना वड्डी आणि कृष्णा घाट दरम्यान हा अपघात घडला. या अपघातात आमदारांच्या गाडीचा पार चक्काचूर झाला असून 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' याचा प्रत्यय आला आहे. गाडीतील एअरबॅग वेळेवर उघडल्यामुळे आमदार सुधीर गाडगीळ, त्यांचे अंगरक्षक आणि स्विय सहाय्यक यांचे प्राण सुदैवाने बालंबाल बचावले आहेत.

​दुचाकीस्वाराला वाचवताना झाला अपघात:

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार गाडगीळ हे आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना, त्यांच्या गाडीसमोर अचानक एक दुचाकी आडवी आली. चालकाने अत्यंत वेगाने येणाऱ्या गाडीला आणि दुचाकीस्वाराला वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वाहनांचा वेग नियंत्रणात न आल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार देखील जखमी झाला आहे.

सर्वजण सुखरूप, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू:
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. आमदार सुधीर गाडगीळ, त्यांचे अंगरक्षक, स्विय सहाय्यक आणि जखमी दुचाकीस्वार यांना तात्काळ उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आणि उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच सांगलीतील कार्यकर्ते आणि नागरिकांकडून आमदार गाडगीळ यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयाबाहेर गर्दी होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.