Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिल्लीत भूकंप! अमित शाह देशाचे नवे उपपंतप्रधान? मोदी मंत्रिमंडळात इतिहासातील सर्वात मोठी 'महासर्जरी'!

दिल्लीत भूकंप! अमित शाह देशाचे नवे उपपंतप्रधान? मोदी मंत्रिमंडळात इतिहासातील सर्वात मोठी 'महासर्जरी'!


उत्तर प्रदेशातील संघटनात्मक घोषणेनंतर आता भाजप केंद्र सरकारमध्ये मोठी ‘महासर्जरी’ करण्याच्या तयारीत आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बलाढ्य मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, तर जागतिक तेल संकटाच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही मंत्र्यांना बढती दिली जाण्याची शक्यता आहे. यातील सर्वांत मोठा फेरबदल म्हणजे केंद्रीय गृहमंत्री महामंत्री केले अमित शाहयांना अधिकृतपणे उपपंतप्रधानपद दिले जाऊ शकते. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना हे पद मिळाले होते. सूत्रांनुसार, अनेक वादग्रस्त आणि अपयशी ठरलेल्या चेहऱ्यांची मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाऊ असून, परराष्ट्र धोरण शकतो.

महुआ मोइत्रांची चर्चा

सर्वांत धक्कादायक राजकीय चर्चा म्हणजे, भाजपचा एक गट तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या महुआ मोइत्रा यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांनी पक्षात प्रवेश केल्यास त्यांना राज्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव आहे. एवढेच नव्हे तर, महुआ भाजपमध्ये आल्यास आगामी निवडणुकीत भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे तिकीट कापले जाईल, असे आश्वासनही त्यांना देण्यात आल्याचे समजते. मात्र, महुआ मोइत्रा यांनी अद्याप यावर आपला कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही.

निर्मला भाजप संघटनेत परत जाण्याची शक्यता
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देशाचे नवीन शिक्षण मंत्री बनवले जाण्याची चर्चा आहे. तसेच त्यांना भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्या टीममध्ये महामंत्री केले जाण्याचीही एक शक्यता आहे.
नीट वाद भोवणार

‘नीट’ परीक्षा आणि ‘सीबीएसई ओएसएम’ वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होऊ शकते. त्यांना भविष्यात संघटनेत किंवा ओडिशामध्ये मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्याबाबत पक्षात मंथन सुरू आहे.

हायकमांड नाराज
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनाही मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. भारत अमेरिका संबंधांबाबत अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्वोच्च नेतृत्व नाराज असून, परराष्ट्र धोरण हाताळण्यात काही त्रुटी राहिल्याचे मानले जात आहे.
कामगिरीचे बक्षीस

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान तेलाच्या किमतींबाबत अनिश्चितता असताना, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली. त्यामुळे त्यांना पेट्रोलियम सोबतच आणखी एखादे मोठे मंत्रालय दिले जाऊ शकते.

राकाँ, शिंदे गटाला स्थान
खासदार संख्या वाढल्यामुळे शिवसेना शिंदे गटाला आणखी एक कॅबिनेट पद मिळू शकते. श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्री तर संजय दिना पाटील यांना राज्यमंत्री केले जाऊ शकते. याशिवाय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राज्यमंत्री केले जाऊ शकते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.