Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोठा हादरा! अदानीला मंजुरी मिळताच महानिर्मितीचे ८ वीज संच बंद होणार? हजारो कुटुंबांची चूल विझणार!

मोठा हादरा! अदानीला मंजुरी मिळताच महानिर्मितीचे ८ वीज संच बंद होणार? हजारो कुटुंबांची चूल विझणार!


मुंबई: अदानी पॉवरची वीज खरेदी करण्याच्या महावितरणच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने 'महानिर्मिती'च्या राज्यभरातील १, ६०० मेगावाॅट क्षमता असलेल्या आठ औष्णिक वीज संचांना टाळे लागणार असल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक म्हणजे यासंदर्भात वीज आयोगापुढे 'महानिर्मिती'ने कुठलाही आक्षेप नोंदवला नाही. महावितरणने अदानी पाॅवरकडून १, ६०० मेगावाॅट वीज खरेदी करण्याचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाला (एमईआरसी) दिला होता. त्याला आयोगाने मंजुरी दिली आहे. २०३०पर्यंत ही वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महानिर्मितीचे वीजनिर्मिती सुरू असलेले जुने आठ वीज संच बंद करण्याची नामुष्की ओढवणार आहे.

२५-३० हून अधिक वर्षे झालेल्या भुसावळ, खापरखेडा, चंद्रपूर आणि नाशिक केंद्रातील १, ६०० मेगावाॅट क्षमतेच्या आठ वीज संचांऐवजी इतर कंपन्यांच्या नव्या औष्णिक वीज केंद्रातून २०३० पासून वीज घेण्याबाबतचा प्रस्ताव महावितरणने तयार केला होता. त्यानुसार स्पर्धात्मक निविदांच्या माध्यमातून आलेल्या अदानी पाॅवरच्या वीज प्रकल्पातून प्रतियुनिट ५.३० रुपये दराने वीज घेण्याचा प्रस्ताव वीज आयोगाला दिला होता. त्याला आयोगाने मंजुरी दिली आहे. महावितरणने वीज न घेतल्यास हे संच बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळणार आहे. राज्य सरकारने अधिकाऱ्यांवर दबाव आणल्यानेच महानिर्मितीने आयोगासमोर आपली बाजू मांडलेली नाही.

- कृष्णा भोयर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन

महानिर्मितीचे मौन महावितरणने वीज आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत महानिर्मिती प्रतिवादी होती. त्यामुळे मुदतीपूर्वी वीज खरेदी करार रद्द करण्याच्या मागणीवर महानिर्मितीने आक्षेप नोंदवणे अपेक्षित होते; मात्र त्यांनी कोणतीही बाजू मांडली नाही. त्यामुळे महानिर्मितीने मौन का बाळगले, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.