सभासदांनी कर्मवीर पतसंस्थेच्या पाठीशी खंबीर उभे रहावे
चेअरमन : श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे कुंभोज शाखेचे प्रशस्त वास्तुत स्थलांतरण संपन्न
कुंभोज :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली च्या कुंभोज ता. हातकणंगले येथील शाखेचे प्रशस्त व आधुनिक कार्यालयात स्थलांतरण कार्यक्रम संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांचे अमृतहस्ते संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.
कर्मवीर पतसंस्था आर्थिक कार्याबरोबरच सामाजिक व सहकार चळवळीच्या तत्वाने काम करीत आहे. एखादी संस्था १२०० कोटीच्या पुढे ठेवी गोळा करु शकते हे सभासदांचा संस्थेप्रती असणारा विश्वास दाखविते आणि आपल्या भागातील संस्था ही राज्य पातळीपर्यंत आपल्या कार्याने नावारुपाला येत आहे हे कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यापुढेही सभासदांनी असेच कर्मवीर पतसंस्थेला भक्कम आधार द्यावा आम्ही संस्थेचा नावलौकीक करु असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. एस. पी. मगदूम यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी कर्मवीर आण्णा व संस्थापक स्व. डॉ. आप्पासाहेब चोपडे यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन संपन्न झाले. स्वागत व प्रास्ताविक करताना चेअरमन श्रीमती भारती चोपडे म्हणाल्या कि, संस्थेने सभासदांसाठी आणलेल्या अनेक योजना या आदर्श ठराव्यात अशा आहेत. गेल्या ३९ वर्षापासून संस्था नियमित चांगले उपक्रम राबवित आहे याचे श्रेय संचालकांचे उत्तम नियोजन आणि त्यास सभासद आणि सेवकां नी दिलेली साथ याला आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्वांचे योगदान हे महत्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संस्था आर्थिक भक्कम पायावर उभी आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी अनेक संस्थांच्यावतीने पतसंस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या व चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी शाखा सल्लागार श्री. सतिश पाटील, श्री. सुभाष पाटील, संजय पाटील, धनपाल कळंत्रे, अशोक पाटील यांचा सत्कार संपन्न झाला. तसेच शाखाधिकारी श्री. अभिनंदन उपाध्ये व विभागीय अधिकारी श्री. अभिजीत खोत, डेकोरेटर कु. प्राची कदम यांचा सत्कार करणेत आला.
यावेळी जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले शरद साखर चे संचालक आप्पासाहेब चौगुले, कर्मवीर ग्रामीण पतसंस्थेचे संचालक किरण माळी, बाबासाहेब चौगुले, अभिनंदन पतसंस्थेचे संचालक बाबासाहेब पाटील, प्रकाश पाटील बलोपंत कुलकर्णी प्रकाश पाटील रखरखे शितल कळंत्रे, भरतेश्वर भोकरे, कार्तिक चौगुले, धुधेश्वर इंगलजे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमास संस्थेचे व्हा. चेअरमन अॅड. एस.पी. मगदूम, संचालक डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. बजरंग भाऊसाो माळी, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र खाडे तसेच श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. एस.बी. पाटील ( मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह कर्मवीर पतसंस्थेचे सभासद, सेवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांनी माणले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.