Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शक्तिपीठ महामार्ग अत्यंत आवश्यक, भूसंपादनाची अधिसूचना जारी; आक्षेप नोंदवण्याची ३० जूनची अंतिम डेडलाईन

शक्तिपीठ महामार्ग अत्यंत आवश्यक, भूसंपादनाची अधिसूचना जारी; आक्षेप नोंदवण्याची ३० जूनची अंतिम डेडलाईन


कुडित्रे: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी आवश्यक जमिनी संपादित करण्याबाबत राज्य शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यामुळे जिल्ह्यातील जमीन संपादन प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, १९५५ अंतर्गत हा महामार्ग सार्वजनिक प्रयोजनासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

प्रसिद्ध झालेल्या नव्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सुपीक जमिनींचा या प्रक्रियेत समावेश असून, यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या हरकती दाखल करण्यात येणार आहेत. शक्तिपीठ मार्गाचे कोणतेही काम सुरू करू देणार नाही. अधिकारी आल्यास त्यांना पळवून लावू, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. जमीन वाचवण्यासाठी जिंकू किंवा मरू, अशी आरपारची लढाई लढू. 

-नितीन भोसले, खुपिरे शेतकरी

तालुक्यातील शेतकरी आणि जमीनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.​ज्या जमीनधारकांच्या हरकती यापूर्वी विचारात घेतलेल्या नाहीत किंवा ज्यांची अद्याप सुनावणी झालेली नाही, अशा सर्व बाधित व्यक्तींना अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० जूनपर्यंत २१ दिवसांच्या आत आपले लेखी आक्षेप नोंदवण्याची अंतिम संधी आहे. या संबंधित हरकती व सूचना भूमी संपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, करवीर उपविभाग यांच्याकडे कारणांसह लेखी स्वरूपात सादर कराव्या लागणार आहेत.​

महामार्गासाठी करवीर तालुक्यातील तब्बल ९४३ एकर क्षेत्र संपादित करण्याचा प्रस्ताव शासनाने जाहीर केला आहे. यामध्ये केर्ली, वरणगे, पाडळी बुद्रुक, शिंदेवाडी, खुपिरे, वाकरे, कुडित्रे, बहिरेश्वर, कसबा बीड, गणेशवाडी, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, हिरवडे, भाटणवाडी, सोनाळी आणि हसूर दुमाला या गावांच्या जमिनींचा समावेश आहे.
पावसाळी अधिवेशनात बैठक, आमदारांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

कोल्हापूर: शक्तिपीठ महामार्गाचा जुना मार्गच कायम करावा किंवा शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यात नागपूर-रत्नागिरी महामार्गाला जोडावा, अशी मागणी जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर याप्रश्नी पावसाळी अधिवेशनात बैठक घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आज ही चर्चा झाली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नरके यांनी शक्तिपीठ महामार्गाचा जुना मार्ग कायम करावा, असा पर्याय मांडला, तर हा मार्ग सांगली जिल्ह्यात रत्नागिरी महामार्गाला जोडावा, असे काही जणांनी सुचवले. यावर या प्रश्नी आपण पावसाळी अधिवेशनात बैठक घेऊन, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.





➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.