Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"विद्यार्थ्यांची क्रूर चेष्टा! नागपूरच्या सेंटरऐवजी थेट 'दुबई' छापून आलं; हॉल तिकीट पाहून अख्खा महाराष्ट्र थक्क!"

​"विद्यार्थ्यांची क्रूर चेष्टा! नागपूरच्या सेंटरऐवजी थेट 'दुबई' छापून आलं; हॉल तिकीट पाहून अख्खा महाराष्ट्र थक्क!"


नागपूर :- देशभरामध्ये नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली होती. आता नीटची फेरपरीक्षा उद्या म्हणजेच 21 जून रोजी होणार आहे. पेपरफुटीचा इतिहास लक्षात घेऊन यावेळेस परीक्षेसाठी सुरक्षेची विशेष तरतूद करण्यात आली आहे. मात्र नागपूरमधील एका विद्यार्थ्यासमोर या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर वेगळीच समस्या उभी राहिल्याचं पाहायला मिळत आहे. या विद्यार्थ्याला नीट परीक्षेचं केंद्र थेट आबूधाबीमध्ये देण्यात आलं आहे.

थेट दुबईमध्ये परीक्षा केंद्र

पेपरफुटीच्या आरोपानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठीची 'नीट'ची फेरपरीक्षा उद्या म्हणजेच 21 तारखेला होणार असून त्यासाठी सर्व परीक्षार्थींना 'नीट'कडून प्रवेश पत्र देण्यात आले आहे. मात्र नागपुरमधील अब्दुल्ला नावाच्या एका परीक्षार्थीने नागपुरसहीत जवळील शहरांचा पर्याय परीक्षा केंद्रासाठी निवडले होते. मात्र त्याला 'यूएई'मधील अबुधाबी परीक्षा केंद्र प्रवेशपत्रावर देण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी या संदर्भात एनटीएच्या हेल्पलाइनवर तक्रार करत परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी केल्याची माहिती आहे. परीक्षा केंद्र बदलून न मिळाल्यास अब्दुल्ला परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

विशेष हेलिकॉप्टरद्वारे अमरावतीत पोहोचल्या प्रश्न पत्रिका
अमरावतीत नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 21 जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेचे प्रश्नपत्रिका संच मुंबईहून विशेष हेलिकॉप्टरद्वारे अमरावतीत आणण्यात आले. कडक पोलीस बंदोबस्त आणि तब्बल 15 वाहनांच्या ताफ्यासह हे पेपर जिल्हा कोषागार भवनात सुरक्षितपणे पोहोचविण्यात आले. देशभरात यापूर्वी नीट पेपरफुटीच्या घटनांमुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी CISF जवानांसह पोलीस, महसूल विभाग, भारतीय डाक सेवा आणि इतर विभागांचे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. परीक्षेची पारदर्शकता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व स्तरांवर विशेष खबरदारी घेतली जात आहे.
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोर्चा

नीट पेपर फुटी प्रकरणी नांदेडमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने 16 तारखेला मशाल मोर्चा काढण्यात आला होता. नीटसारख्या अत्यंत महत्वाचा पेपर फुटल्याने शिक्षमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. नांदेड शहरातील व्ही आय पी रोडवरून काल रात्री हा मशाल मोर्चा काढण्यात आला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्चात मोठ्या संख्येने मशाल मोर्चात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.