Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमित शहांचा कोल्हापूर दौरा: २४ तासांच्या मुक्कामासाठी दिल्लीतून आचारी, तर पुण्याहून आले डंबेल्स!​

अमित शहांचा कोल्हापूर दौरा: २४ तासांच्या मुक्कामासाठी दिल्लीतून आचारी, तर पुण्याहून आले डंबेल्स!


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि फिटनेससाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान येत आहे. केवळ एक दिवसाच्या मुक्कामातही गृहमंत्र्यांच्या दिनचर्येत कोणताही बदल होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. शासकीय विश्रामगृहात त्यांच्यासाठी खास ट्रेडमिल आणि पुण्यातून आणलेले वजनी डंबेल्स ठेवण्यात आले आहेत.
​राजकीय दौऱ्याच्या या धावपळीत शहा यांच्या डाएटचीही विशेष काळजी घेतली जात आहे. दिल्लीहून आलेल्या विशेष आचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सकाळचा नाश्ता आणि जेवण तयार केले जात आहे. अन्नपदार्थांच्या सुरक्षेपासून ते व्यायामशाळेच्या साहित्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची 'झेड प्लस' सुरक्षा यंत्रणेकडून कसून तपासणी करण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.