Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेतर्फे मयत कर्जदाराच्या वारसांना १० लाखाची विमा रक्कम सुपुर्द

कर्मवीर पतसंस्थेतर्फे मयत कर्जदाराच्या वारसांना १० लाखाची विमा रक्कम सुपुर्द


सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा इनाम धामणी येथुन सभासद श्री. क्रां तीकुमार बापुसो शेडबाळे यांनी त्यांच्या घरगुती कारणासाठी रु. १० लाखाचे कर्ज घेतले होते. दिनांक ३१/०१/२०२६ रोजी त्यांचा अपघाती मृत्यु झाला आर्थिक स्थिती सुधारावी असे स्वप्न पाहुन त्यांनी कर्ज घेतले पण दुदैवाने त्यांच्या निधनामुळे चांगल्या हेतुने घेतलेले कर्ज त्यांच्या कुटूंबाला बोजा ठरले असते जर कर्मवीर पतसंस्थेने कर्जदारांना अपघाती विमा कवच उपलब्ध करुन दिले नसते तर, कर्मवीर पतसंस्थेने इफको टोकीओ इन्शुरन्स कं.लि., सोबत करार करुन संस्थेच्या ५० लाखापर्यंतच्या कर्जदारास नाममात्र विमा हप्ता घेवून विमा कवच उपलब्ध केले यामुळे संस्थेचे कर्ज परतफेड होवून उर्वरीत रक्कम वारसाना परत केली जाते. या योजनेमध्ये समाविष्ट कर्जदाराचा अपघाती मृत्यु झाल्यास शिल्लक कर्ज रक्कम परतफेड होवून उर्वरित रक्कम कर्जदाराच्या वारसांना दिली जाते. त्याचा कर्जदाराच्या कुटूंबाला आधार होवून संस्थेचे कर्ज देखील सुरक्षित होत आहे. याचा लाभआजपर्यंत अनेक कुटूंबाना होवून त्यांचे कर्ज नील झाले आहे. 

या नुसार नुकतेच मयत कर्जदार यांच्या पत्नी श्रीमती स्मिता क्रां तीकुमार शेडबाळे व त्यांचा मुलगा यांना संस्थेच्या वतीने कर्ज निल दाखला व उर्वरीत रकमेचा धनादेश संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी शेडबाळे यांच्या कुटूंबियांना गहिवरुन आले.

या प्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. एस.पी. मगदूम संचालक डॉ. रमेश वसंतराव ढबू, संचालिका सौ. चंदन नरेंद्र केटकाळे, संचालक श्री. आप्पासो दादू गवळी, श्री. बजरंग भाऊसो माळी, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासो भाऊसो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.