Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई हादरली! मिरा रोडला पार्क केलेल्या कारची एअरबॅग अचानक उघडली; २५ वर्षीय कार डीलरचा जागीच दुर्दैवी मृत्यू

मुंबई हादरली! मिरा रोडला पार्क केलेल्या कारची एअरबॅग अचानक उघडली; २५ वर्षीय कार डीलरचा जागीच दुर्दैवी मृत्यू


मुंबईतील मीरा रोड येथे एका जुन्या गाडीची तपासणी करत असताना एक भीषण अपघात घडला. विक्रीसाठी आणलेल्या गाडीची तपासणी करत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला. तपासणीदरम्यान, गाडीतील स्टिअरिंग एअरबॅग अचानक उघडली, या एअरबॅगच्या कव्हरचा जोरात झटका मानेला बसला.

या घटनेत तो तरुण गंभीर जखमी झाला.

त्या तरुणाच्या मानेला गंभीर दुखापत झाली, यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी त्या तरुणाला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताची ओळख २५ वर्षीय मोहित सुरेश सोनी अशी पटली आहे. तो मीरा रोडवरील टियारा हिल्स हाउसिंग सोसायटीमध्ये राहत होता. त्याचा जुन्या गाड्यांचा विक्रीचा व्यवसाय होता.

कार तपासणी दरम्यान अपघात
काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले की, ही घटना गुरुवारी दुपारी काशिमिरा येथील प्लेझंट पार्क सोसायटीजवळ घडली. मोहित सोनी यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला थांबवली होती आणि ते तिची तांत्रिक तपासणी करत होते. ते कार खरेदी करण्यापूर्वी तिची तांत्रिक गोष्टींची स्थिती तपासत होते. दरम्यान, स्टिअरिंग व्हीलमधील एअरबॅग अचानक उघडली. एअरबॅगचे कव्हर प्रचंड वेगाने उडून मोहितच्या मानेच्या उजव्या बाजूला इतक्या जोरात आदळले की, त्याचा आघात इतका जोरदार होता की, त्यामुळे मानेला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
रुग्णालयात पोहोचायची आधीच झाला मृत्यू

पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मोहित सोनी यांना लगेच रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे घोषित केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.