पतीदेवाच्या दीर्घआयुष्यासाठी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला प्रदिक्षणा घालून नवऱ्यासाठी वरदान मागतात. त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी ते व्रत पाळत असतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र एका महिलेनं वेगळ्याच प्रकारची वटसावित्री पोर्णिमा साजरी केली. नवऱ्याला असलेलं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी महिलेनं चक्क वडाच्या झाडाला दारूच्या बाटल्या लटकवल्या.
महिलेनं छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात वडाच्या झाडाला दारूच्या बाटल्या लटकवून वटपौर्णिमा साजरी केली. वटपौर्णिमा साजरी करताना त्या महिलेने माझ्या नवऱ्याची दारू सोडवा अशी विनवणी पोलिसांना केली. लग्नाला तब्बल २५ वर्षे झाली, पण नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याची वेदना एका महिलेने अनोख्या पद्धतीने व्यक्त केली.
नवऱ्याने दारू कायमची सोडावी, या आशेने तिने वडाच्या झाडालाच चक्क दारूच्या बाटल्या बांधत वटपौर्णिमेची पूजा केली. या अनोख्या कृतीची क्रांती चौकात पोलिसांची तारांबळ उडाली. काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे होणारे नुकसान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पोलिसांनी विनवणी करून त्या महिलेला बाजूला केले.
बाभुळगाव बुद्रूक येथे महिलांचा अनोखा उपक्रम
नाशिकच्या येवला तालुक्यातील बाभुळगाव बुद्रूक येथे वटपौर्णिमेचे औचित्य साधून महिलांनी एक स्तुत्य व आदर्श उपक्रम राबवला. सामाजिक कार्यकर्त्या निर्मला भालेराव यांच्या पुढाकाराने गावातील महिलांनी एकत्र येत पारंपरिक सण साजरा करण्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्मशानभूमीत वृक्षारोपण केले.वटपौर्णिमेनिमित्त निर्मला भालेराव यांनी गावातील महिलांना एकत्र केले. याप्रसंगी महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून पारंपरिक पद्धतीने उखाणे घेतले. या आनंदी वातावरणात महिलांनी केवळ धार्मिक विधी न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचे ठरवले. त्यानुसार गावातील स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.