भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर (जेटीओ) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बीएसएनएलमध्ये ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 100 उमेदवारांची निवड केली जाईल. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 4 जूनपासून सुरू झाली. इच्छुक आणि पात्र उमेदवार 3 जुलै 2026 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात.
externalexam.bsnl.co.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम मुदत जवळ येत आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा. या भरती मोहिमेद्वारे, बीएसएनएल (BSNL) 100 ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर पदांसाठी उमेदवारांची निवड करणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षेचा समावेश आहे. त्यामुळे, अनुभवाशी संबंधित कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही. कोणताही कामाचा अनुभव नसलेले फ्रेशर्सदेखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
बीएसएनएल भरती 2026
कंपनीचे नाव - भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)
पदाचे नाव - ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर (जेटीओ)
पदांची संख्या - 100
अधिकृत वेबसाईट - externalexam.bsnl.co.in
अर्ज करण्याची अंतिम तारी - 3 जुलै 2026
अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख - 3 जुलै 2026
वयोमर्यादा - 20-30 वर्षे
पगार - वेतनश्रेणीनुसार दरमहा ₹16,400-₹40,500/-
निवड प्रक्रिया - लेखी परीक्षा
अर्ज भरण्यापूर्वी भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करा. अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी BSNL Recruitment 2026 pdf या लिंकवर क्लिक करा.
बीएसएनएल भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
शैक्षणिक पात्रता - ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / रेडिओ / कॉम्प्युटर / इलेक्ट्रिकल / माहिती तंत्रज्ञान / इन्स्ट्रुमेंटेशन यापैकी कोणत्याही शाखेत बी.ई. / बी.टेक. किंवा समकक्ष पदवी पूर्ण केली आहे, ते जेटीओ (JTO) भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. एम.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) असलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. एम.टेक. केलेले उमेदवार देखील पात्र आहेत.वयोमर्यादा - उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
बीएसएनएल भरतीसाठी अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम, www.externalexam.bsnl.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
आता तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल वापरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. तुम्हाला पडताळणीसाठी दोन्हीवर एक ओटीपी मिळेल.
यानंतर, लॉग ईन करा आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करा.
तुमचे नाव, पालकांचे नाव, वय, प्रवर्ग, 10वी, 12वी, पदवी आणि पदव्युत्तर पदवीची माहिती भरा.
यानंतर, एक सर्कल निवडा. तुमच्या आवडीनुसार 21 सर्कल्समधून तुमची पसंती भरा.
आता, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही यांसारखी कागदपत्रे 20 केबी ते 50 केबी फॉरमॅटमध्ये अपलोड करा. तुम्हाला तुमची 10वीची मार्कशिट, पदवी, आरक्षण प्रमाणपत्र इत्यादी देखील अपलोड करावे लागेल.
संपूर्ण अर्ज योग्यरित्या भरल्यानंतर, तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज भरा आणि अर्जाची प्रिंटआउट घ्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.