धक्कादायक: सांगली जिल्ह्यात कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी टोळी गजाआड; ८ गुन्हे उघड, ८.५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तासगावजवळ मोठी कारवाई; १ सराईत आरोपी अटक, ५ साथीदारांचा शोध सुरू
सांगली: सांगली आणि सातारा जिल्ह्यात कोयत्याचा आणि चाकूचा धाक दाखवून जबरी चोऱ्या व घरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. करण ऊर्फ करंज रज्जा शिंदे (वय १९, रा. हुबालवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे सांगली, पलूस, आष्टा, कुरळप, कुंडल आणि सातारा परिसरातील तब्बल ८ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, आरोपीकडून ८,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीतील इतर ५ साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
देवराष्ट्रे येथील घटनेने खळबळ, पोलिसांनी आवळले पाश
दिनांक १२ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे एक थरारक घटना घडली होती. फिर्यादी बाबुराव बलभीम सुतार यांच्या घरात दोन अज्ञात इसमांनी घुसून त्यांच्या पत्नी, आई आणि दोन मुलांना कोयत्याचा धाक दाखवला होता. महिलांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र, बोरमाळ व कर्णफुले जबरदस्तीने हिसकावून चोरटे पसार झाले होते.
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सपोनि राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले होते.
तासगाव फाट्यावर टाकला छापा
दिनांक १८ जून २०२६ रोजी एलसीबीचे पथक तासगाव भागात पेट्रोलिंग करत असताना, पथकातील पोहेकों उदयसिंह माळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक संशयित इसम तासगावमधील 'पाचवा मैल' परिसरात फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सपोनि राजेंद्र यादव यांच्या पथकाने तात्काळ सापळा रचून आरोपी करण ऊर्फ करंज शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे सोन्याचे दागिने मिळून आले.तपासात उघड झालेले ८ गंभीर गुन्हे:आरोपीने आपल्या साथीदारांसह सांगली व सातारा जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याची कबुली दिली आहे. तपासात खालीलगुन्हे उघड झाले आहेत:चिंचणी वांगी पोलीस ठाणे: देवराष्ट्रे येथे सुतार यांच्या घरात कोयत्याचा धाक दाखवून सोन्याची जबरी चोरी.कुंडल पोलीस ठाणे: किर्लोस्करवाडी येथे झाकीर जमीर मुलाणी यांच्या घरात घुसून धाक दाखवून सोन्या-चांदीची लूट.पलूस पोलीस ठाणे (गुन्हा १): नागराळे येथे सुरैय्या निजाब मुलाणी यांच्या घरात चाकूचा धाक दाखवून दागिने व रोकड लंपास.पलूस पोलीस ठाणे (गुन्हा २): बुर्ली येथे अजय रामचंद्र पाटील यांच्या घरात घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरी.आष्टा पोलीस ठाणे (गुन्हा १): वाळवा येथे उमेश माणिक नायकवडी यांच्या घराचा ग्रीलचा दरवाजा तोडून सोन्याचे दागिने चोरी.आष्टा पोलीस ठाणे (गुन्हा २): बहादूरवाडी येथे सरदार बादशाह जमादार यांच्या घरात घरफोडी.कुरळप पोलीस ठाणे: वशी येथे उषाताई बापू बावचकर यांच्या घराचा दरवाजा उघडून सोन्याचे दागिने लंपास.सातारा शहर पोलीस ठाणे: सातारा येथून संदीप देशमुख यांची चोरी केलेली हिरो स्प्लेंडर मोटार सायकल हस्तगत.
हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल:
५५ ग्रॅम सोन्याचे दागिने: (मणीमंगळसूत्र, गंठण, बोरमाळ, कर्णफुले, अंगठी) - किंमत रु. ८,००,०००/-
हिरो स्प्लेंडर मोटार सायकल: (गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची दुचाकी) - किंमत रु. ५०,०००/-
एकूण मुद्देमाल: ८,५०,०००/- रुपये
सराईत गुन्हेगारांची टोळी; 'मोका'सारखे गुन्हे दाखल
पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे की, अटक केलेला आरोपी आणि त्याचे साथीदार हे अत्यंत सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर सांगलीसह शेजारील जिल्ह्यांत खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि थेट 'मोका' (MCOCA) सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली:एलसीबी: पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि राजेंद्र यादव, पोहेकों उदयसिंह माळी, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, अरुण पाटील, सतिश माने, मोतीराम खोत, अमर नरळे, पोकों सुरज थोरात, विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर, संकेत कानडे, सुशांत चिले.चिंचणी वांगी पोलीस: सपोनि राहुल घुगे, पोउपनि योगेश शेलार, पोकों विक्रम कुंभार, विनायक सावळगे, प्रविण मलमे.सायबर पोलीस ठाणे: पोहेकों सतिश अलदर, पोशि करण परदेशी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे.या गुन्ह्याचा पुढील सविस्तर तपास सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली) हे करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.