लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आरोग्य केंद्रात कालबाह्य औषधांचा साठा आणि मुदत संपलेली वैद्यकीय साहित्य आढळून आल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात एक्सपायरी डेट संपलेली औषधे साठवून ठेवण्यात आली होती. यामुळे ही औषधे रुग्णांना दिली जात होती का? असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात सरकारी आरोग्य सेवांवर अवलंबून असतात.
अशा परिस्थितीत जर आरोग्य केंद्रातच निष्काळजीपणा होत असेल, तर रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.