Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

देशातील कोट्यवधीरेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. 'वन नेशन, वन रेशन कार्ड' (ONORC) योजनेअंतर्गत रेशन वितरण व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून, आता लाभार्थ्यांना संपूर्ण धान्य एकाच रेशन दुकानातून घेण्याची सक्ती राहणार नाही.
केंद्रीय राज्यमंत्री बी.एल. वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन कार्डधारक आता एका दुकानातून गहू तर दुसऱ्या दुकानातून तांदूळ घेऊ शकणार आहेत. म्हणजेच, नागरिकांना त्यांच्या सोयीप्रमाणे देशातील कोणत्याही सरकारी रेशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. सरकारने ही प्रणाली बँकेतील एटीएमसारखी लवचिक केली आहे. जसे ग्राहक कोणत्याही एटीएममधून पैसे काढतात, तसेच रेशनधारकही देशभरातील कोणत्याही रेशन दुकानातून आपला कोटा घेऊ शकतील.
या निर्णयाचा सर्वाधिक लाभ स्थलांतरित मजूर, रोजंदारी कामगार आणि दुसऱ्या शहरात किंवा राज्यात काम करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. आता त्यांना मूळ गावातील रेशन दुकानावर अवलंबून राहण्याची गरज नाही. जिथे ते सध्या राहत आहेत, तिथल्या जवळच्या रेशन दुकानात आधार कार्ड आणि बायोमेट्रिक पडताळणीद्वारे सहज धान्य मिळू शकणार आहे.

पारदर्शकतेसाठी तांत्रिक सुधारणा

सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अधिक पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी सरकारकडून तांत्रिक बदलही करण्यात येत आहेत. सर्व रेशन दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाटे ई-पॉस मशीनशी जोडले जात आहेत. यामुळे गैरव्यवहार आणि चोरीला आळा बसणार आहे तसेच लाभार्थ्यांना अचूक प्रमाणात धान्य मिळण्याची खात्री मिळणार आहे.

'मेरा रेशन 2.0' अॅपची सुविधा
सरकारने 'मेरा रेशन 2.0' मोबाईल अॅपही उपलब्ध करून दिले आहे. या अॅपद्वारे नागरिकांना शिल्लक रेशन कोटा, जवळचे रेशन दुकान, आधार लिंकिंगची स्थिती, व्यवहाराचा तपशील ही सर्व माहिती सहज मिळणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.