Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील 3 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, CM फडणवीस यांचा मोठा निर्णय

राज्यातील 3 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, CM फडणवीस यांचा मोठा निर्णय


मुंबई : राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत वेगाने बदल होत असून तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने सामान्य प्रशासन विभागाने २२ जून २०२६ रोजी हे आदेश जारी केले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि महापारेषण (MSETCL) यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून कॅबिनेट बैठकीच्या दिवशी वा आसपास आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यात देखील बदल्यांची परंपरा कायम राहिली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तीन बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत.

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली झाली?

१. पी. वेलरासू (IAS:RR:2002)
नवीन नियुक्ती: अप्पर महानगर आयुक्त, एमएमआरडीए (MMRDA), मुंबई.
पी. वेलरासू यांच्या संदर्भात गेल्या १६ जून २०२६ च्या आदेशात अंशतः बदल करण्यात आला असून, आता त्यांच्याकडे एमएमआरडीएच्या अप्पर महानगर आयुक्तपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
२. डॉ. संजीव कुमार (IAS:RR:2003)

पूर्वीचे पद: अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण)
नवीन नियुक्ती: सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
महापारेषणचा कारभार सांभाळणारे डॉ. संजीव कुमार यांच्याकडे आता मंत्रालयातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदाची धुरा देण्यात आली आहे.

३. विक्रम कुमार (IAS:RR:2004)
पूर्वीचे पद: अप्पर महानगर आयुक्त, एमएमआरडीए (MMRDA), मुंबई.
नवीन नियुक्ती: अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण)
एमएमआरडीएमध्ये कार्यरत असलेले विक्रम कुमार आता डॉ. संजीव कुमार यांच्या जागी महापारेषणचे (MSETCL) नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) म्हणून पदभार स्वीकारतील.

राज्य सरकारच्या नव्या आदेशांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषतः एमएमआरडीए आणि ऊर्जा विभागाशी संबंधित असलेल्या महापारेषणमधील ही फेरबदल आगामी काळातील विविध विकासप्रकल्प आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.