Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षण क्षेत्र कलंकित! कोल्हापूर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या दारातच शिक्षणाधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या; लाच घेताना रंगेहात पकडले!

शिक्षण क्षेत्र कलंकित! कोल्हापूर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या दारातच शिक्षणाधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या; लाच घेताना रंगेहात पकडले!

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रभारी शिक्षणाधिकारी डी. सी. कुंभार यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शिक्षण समितीच्या कार्यालयाच्या बाहेरच पोलिसांनी कुंभार यांना ताब्यात घेतले. 25 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी ही कारवाई झाली आहे.

डी. सी. कुंभार हे जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागात विस्तार अधिकारी आहेत. त्यांच्याकडे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार आहे. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास प्राथमिक शिक्षण समितीच्या कार्यालयाच्या इमारतीबाहेरच त्यांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. घटनेमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
याप्रकरणी एका शिक्षकानं लाचलुचपत विभागाला तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार विभागाच्या पोलिसांनी सापळा रचला, त्यानंतर आरोपी शिक्षणाधिकारी डी. सी. कुंभार अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तक्रारदार शिक्षक हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेत बदलीवर आले आहेत. त्यांचा थकीत पगार व पगाराचा फरक मिळावा यासाठी त्यांनी अर्ज केला होता. ही रक्कम काढून देण्यासाठी शिक्षणाधिकारी डी. सी. कुंभार यांनी तक्रारदाराकडं ४०,००० रुपयांची मागणी केली होती.

शिक्षणाधिकाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडं अधिकची चौकशी केल्यानंतर डी.सी. कुंभार यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांनी आंतर जिल्हा बदलीबाबत ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारीपूर्वी 10,000 रूपये स्विकारल्याचे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांसमोर कबूल केलं. त्यानंतर तक्रारदाराचा थकीत पगार व पगाराचा फरक काढून देण्यासाठी ४०,००० रुपयांची मागणी केली त्याबदल्यात तडजोड करुन २५,००० रूपये स्विकारले. दरम्यान, तक्रारदाराकडून २५,००० रुपयांची लाच स्वीकारताना कुंभार यांना पोलिसांनी रंगेहात सापडले. त्याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.