अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. विधान परिषदेच्या निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आंबेडकर म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेवटपर्यंत लढले, मात्र काँग्रेसचे काही उमेदवार मैदानातून बाहेर पडले किंवा लढलेच नाहीत. त्यामुळे राज्यातील विरोधी राजकारण कमकुवत होत असल्याची टीका त्यांनी केली.
राजकीय व्यवस्थेला लकवा, आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदीची छी थू
'विधान परिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेवटपर्यंत लढले. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे पळून गेले, काही लढलेच नाही. इथले राजकीय पक्ष गुलाम होताय का"transliteration">असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीकेले.
'भाजपला अंगावर घेणे आंबेडकरी चळवळीशिवाय कोणी करू शकत नाही'
'भाजपला अंगावर घेणे आणि सत्तेतून खाली खेचणे हे आंबेडकरी चळवळीशिवाय दुसरे कोणी करू शकत नाही. हा फोर्स आपल्यासोबत घ्यायचा नसेल तर यांना 'बी टीम' म्हणून स्टॅम्प मारण्याचे काम ज्यांना आमची मदत पाहिजे होती, ते इथले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, डावे पक्ष यांनी केले. आज तेच भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.'
'देश आर्थिक गुलामीकडे जात आहे', विरोधी पक्षांनाही टोला
प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला की, 'आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींवर टीका होत असून देश आर्थिकदृष्ट्या अडचणीत जात आहे. त्यांनी असेही म्हटले की, राजकीय व्यवस्था निष्क्रिय झाली तर सामान्य नागरिकांनी पुढे येऊन आवाज उठवला पाहिजे. महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचा आरोप करत, भाजपसोबत न जाणारेच खरे विरोधक असल्याचे निकष जनतेने लावावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
मोदींच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह ?
तेयावेळीम्हणाले, 'पंतप्रधान मोदी यांच्या चारित्र्यावर सुब्रहमण्यम स्वामी, मधुकिश्वर, संदीप वानखेडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदीने देश गहाण ठेवला आहे. आंतराष्ट्रीय शक्तीने मोदीला गुलाम केले, मोदीने मोहन भागवतला आणि राजकीय पक्षांना गुलाम केले. सर्वसामान्य मतदारांना आवाहन आहे की, मतदाराला लकवा झालेला नाहीये. त्यांनी आपल्या हातात परिस्थिती घेतली पाहिजे. कारण, हे राजकीय पक्ष सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले आहेत. लोक लढ्यातून आपले प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आले पाहिजे.'
स्मार्ट मीटर योजनेवर सरकारला थेट सवाल
स्मार्ट मीटर योजनेवरही प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला लक्ष्य केले. जुने वीज मीटर कार्यरत असताना जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याची गरज काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, स्मार्ट मीटरच्या कंत्राटांबाबत पारदर्शकता राखावी आणि संबंधित कंपन्यांचा व सत्ताधारी पक्षाचा काही संबंध आहे का, याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.