Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अदानींची याचिका अमेरिकन कोर्टाने उडवून लावली! 'त्या' फसवणूक प्रकरणात न्यायालयानं मागवलं स्पष्टीकरण

अदानींची याचिका अमेरिकन कोर्टाने उडवून लावली! 'त्या' फसवणूक प्रकरणात न्यायालयानं मागवलं स्पष्टीकरण


उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधातील लाचखोरीचा गुन्हेगारी खटला लगेच रद्द करण्यास अमेरिकेतील एका न्यायालयाने नकार दिला आहे. अदानी यांच्याविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय योग्य असल्याची कारणे अमेरिकेच्या न्याय विभागाने सांगावीत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अदानी यांच्याविरोधात लाचखोरीशी संबंधित सिक्युरिटीज आणि वायर घोटाळ्याचे आरोप होते. अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी 18 मे रोजी घोषणा केली होती की, अदानी यांच्याविरोधात यासंदर्भातील गुन्हेगारी खटला चालवणार नाही. 

त्यानंतर अदानी यांच्या वकिलांनी बुधवारी अमेरिकेतील जिल्हा न्यायाधीश निकोलस गराउफिस यांच्याकडे हा खटला रद्द करण्याची विनंती केली होती. मात्र, न्या. गराउफिस यांनी त्यांची विनंती फेटाळली. त्यांनी सांगितले की, सरकारी वकिलांची नोटीस याप्रकरणी सविस्तर खुलासा करत नाही. सरकारचे संक्षिप्त निवेदन कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास पुरेसे नाही. तसेच खटला रद्द करण्यासाठीदेखील योग्य नाही. त्यामुळे गुन्हेगारी प्रकरण मागे घेण्याच्या निर्णयामागील कारणे सविस्तर सांगावीत, असे न्या. गराउफिस यांनी स्पष्ट केले.

असे आहे प्रकरण…
अदानी समूहाच्या एका पंपनीला सौर उैर्जा निर्मिती केंद्र विकसित करण्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱयांना लाच देण्यास सहमती दर्शविली होती. यामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप गौतम अदानी यांच्याविरोधात 2024 मध्ये करण्यात आला होता. हे आरोप रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.