Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"आजकाल मुलांना..." केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणावर कंगना रणौतची मोठी प्रतिक्रिया; सिया गोयलच्या पालकांना दिला पाठिंबा!

​"आजकाल मुलांना..." केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणावर कंगना रणौतची मोठी प्रतिक्रिया; सिया गोयलच्या पालकांना दिला पाठिंबा!


पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. होणाऱ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगडावर गेलेल्या केतन अग्रवालचा पाय घसरून दरीत मृत्यू पडल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र केतनचा मृत्यू हा अपघात नसून सुनियोजित कट असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने केतनला दरीत ढकलून दिलं. सिया आणि बॉयफ्रेंड चेतन चौधरीने पोलीस चौकशीत त्यांच्या गुन्ह्याची धक्कादायक कबुली दिली. या प्रकरणानंतर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त होतो आहे. कंगना रणौतने या प्रकरणावर भाष्य करत सियाच्या आईवडिलांना सपोर्ट केला आहे.

कंगनाने इन्स्टाग्रामवरुन स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने म्हटलं की "आजकाल कुटुंब किंवा आईवडिलांना पाहून मुलांवरील संस्काराचा अंदाज बांधणं कठीण आहे. त्यांच्यावर काय संस्कार होत आहेत आणि ते कुणासोबत वेळ घालवत आहेत, हे पाहणं गरजेचं आहे. सोशल मीडिया किंवा AI यांचा त्यांच्या जीवनावर काय परिणाम होत आहे. यामध्ये आपण आईवडिलांना दोष देऊ शकत नाही. कारण, ते एकाच वेळी अनेक प्रकारे आयुष्य जगत आहेत. ते आपण खूप चांगले असल्याची प्रतिमा तयार करतात. ते खरे कसे आहेत हे लोकांना त्यांना दाखवायचं नसतं. त्यामुळे मुलांच्या वागणुकीसाठी कुटुंबाला आपण दोषी ठरवू शकत नाही".

केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा झाला होता. नोव्हेंबर महिन्यात त्या दोघांच्या लग्नाचा मुहुर्त होता. त्यांच्या लग्नासाठी १७ कोटी खर्च करून पॅलेस बुक करण्यात आला होता. त्यांच्या लग्नाची जय्यत तयारी दोन्ही कुटुंबात सुरू होती. मात्र त्याआधीच ही दुर्देवी घटना घडली. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतनला पोलिसांनी अटक केली असून त्यांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.