भाजपा सरकारला पराभूत करण्याचे आवाहन राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी सोमवारी केले. सरकारने देशाला लुटले असून प्रभू रामालाही सोडले नाही, असा आरोप खासदार सिब्बल यांनी केला. मोदी सरकारने दिलेली 'अच्छे दिन'ची घोषणा देखील थाप होती, अशी टीका सिब्बल यांनी केली. कपिल सिब्बल यांनी एक्स आणि फेसबुकवर एक यमक जुळणारी कविता शेअर केली असून, या कवितेच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे.
कपिल सिब्बल यांची टीका
राज्यसभा खासदार सिब्बल यांनी, 'या सरकारचा पराभव करा, प्रभू रामाला लुटले, देशाला लुटले', असा आरोप करत 'अच्छे दिन'ची घोषणा थाप होती, अशी टीका केली. अयोध्येतील राम मंदिरात देण्यात आलेल्या देणगीत कथित गैरव्यवहारावरुन आरोप- प्रत्यारोप होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने या गैरव्यवहारप्रकरणी एसआयटी स्थापन केली आहे. देणगीतील या गैरव्यवहार प्रकरणावरुनच कपिल सिब्बल यांनी सरकारवर टीका केली आहे.
सिब्बल यांची पोस्ट काय?
कपिल सिब्बल यांनी सोशल मीडियावर याबाबत एक हिंदी कविता शेअर केली आहे.या सरकारचा पराभव कराप्रभू श्रीरामाला लुटलेदेशाला लुटलेअच्छे दिन ची घोषणा थापअशा सरकारला हटवुयामिळून देशाला जोडूयामनं कधीच तुटणार नाहीतआपला देश सर्वांचा आहे
विरोधकांची सरकारवर टीका
राम मंदिर देणगीत झालेल्या कथित गैरव्यवहारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पंतप्रधान मोदींच्या या मौनावरुन विरोधकांनी सवाल उपस्थित करत, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कथित गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसने सरकारकडून उत्तर मागितले असून, हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नाही तर नागरिकांच्या विश्वासाशी विश्वासघात केल्याचा आरोप केला. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने या गैरव्यवहारप्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे.
आठ जणांना अटक
एसआयटीच्या अहवालानुसार, राम मंदिर देणगीतील गैरव्यवहारप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अयोध्येतील स्थानिक न्यायालयाने आठही जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.