Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर पैशांचा पाऊस! आयपीएल पुरस्कार सोहळ्यात कारसह तब्बल 'इतक्या' लाखांचे बक्षीस

​१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर पैशांचा पाऊस! आयपीएल पुरस्कार सोहळ्यात कारसह तब्बल 'इतक्या' लाखांचे बक्षीस


इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेची (IPL 2026) अखेर रविवारी सांगता झाली. अहमदाबादला झालेला अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला ५ विकेट्सने पराभूत करत जिंकला. यासह रजत पाटिदारच्या  नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले.
त्यामुळे बंगळुरू तिसराच संघ ठरला, ज्यांनी सलग दोन हंगामात विजेतेपद जिंकले. याआधी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांनी सलग दोन वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. असं असलं तरी अंतिम सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात मात्र १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने एक-दोन नाही, तर तब्बल ५ पुरस्कार  जिंकले.
राजस्थान रॉयल्ससाठी खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीसाठी आयपीएल २०२६ हंगाम खास राहिला. त्याने १६ सामन्यात ४८.५० सरासरीने आणि २३७.३१ च्या स्ट्राईक रेटने ७७६ धावा केल्या. त्याने ६३ चौकार आणि ७२ षटकार मारले, म्हणजेच तब्बल ६८४ धावा त्याने बाऊंड्रीतून मारले होते. याशिवाय त्याने ५२१ धावा पॉवरप्लेच्या षटकांमध्ये (१ ते ६ षटके) केल्या.
तो एका हंगामात पॉवरप्लेमध्ये ५०० हून अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. वैभवने प्लेऑफच्या दोन सामन्यात ९७ आणि ९६ धावांच्या खेळीही केल्या. याशिवाय त्याने साखळी फेरीत ३७ चेंडूत शतक करण्याचाही पराक्रम केला.

त्याच्या या कामगिरीमुळे त्याने अनेक पुरस्कारांवर त्याचे नाव कोरले. तो आयपीएल २०२६ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरल्याने त्याने ऑरेंज कॅप  जिंकली. त्यासाठी त्याला ट्रॉफी आणि १० लाख रुपये मिळाले.

इतकेच नाही, तर तो आयपीएल २०२६ स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू देखील ठरला. त्यासाठी त्याला १५ लाखांचे बक्षीस मिळाले. तो सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू  ठरला, ज्यासाठी त्याला १० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.

एवढेच नाही, तर वैभवचा आयपीएल २०२५ मध्ये सर्वोत्तम स्ट्राईक रेट असल्याने त्याला टाटा सियारा  कार बक्षीस म्हणून मिळाली. याशिवाय सर्वाधिक ७२ षटकार मारल्याने त्याला १० लाख रुपये बक्षीस मिळाले. म्हणजेच वैभवला एकूण ४५ लाख रुपये आणि कार असे बक्षीस मिळाले.
वैभव हा आयपीएलच्या एका हंगामात ७०० धावा पार करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू आहे. आता त्याचे लक्ष भारताच्या संघात स्थान मिळवण्याचे आहे. तो आता आगमी श्रीलंका अ संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये भारतीय अ संघाकडून खेळताना दिसणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.