Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'कॉकरोच जनता पार्टी'चे अभिजित दिपके भारतात परतणार; ६ जून रोजी दिल्लीत होणार 'महाआंदोलन'!

'कॉकरोच जनता पार्टी'चे अभिजित दिपके भारतात परतणार; ६ जून रोजी दिल्लीत होणार 'महाआंदोलन'!


NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणातमुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, सोशल मिडियावरील प्रसिद्ध व्यंगात्मक पेज 'कॉक्रोच जनता पार्टी' चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठी केली आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी ते येत्या ६ जून रोजी भारतात परतणार असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत.
अभिजीत दिपके यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत या आंदोलनाची माहिती दिली. "आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन, भारतीय संविधानाच्या मार्गाने शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवला पाहिजे. जर आपण सर्वांनी मिळून आवाज उठवला, तर त्यांना आपला आवाज ऐकावाच लागेल," असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना केले आहे.
जंतरमंतरवर आंदोलनाची तयारी

आपल्या आंदोलनाची पुढील रुपरेषा स्पष्ट करताना दिपके म्हणाले, "मी शनिवारी, ६ जून रोजी सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचणार आहे. तिथून आम्ही सर्वजण संसदेच्या जवळ असलेल्या पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाऊ. तिथे जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली जाईल."

लाखो विद्यार्थ्यांचे समर्थन
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून 'नीट' परीक्षेतील घोटाळ्याविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावर दिपके सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांच्या या मोहिमेला देशभरातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन याचिकेवर आतापर्यंत तब्बल ८ लाख विद्यार्थ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर कोट्यवधी लोकांनी या मागणीचे समर्थन केले आहे. लखनऊ, जयपूर आणि महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत या मुद्द्यावरून तीव्र आंदोलने सुरू आहेत.
१ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

शिक्षण व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करत दिपके म्हणाले की, NEET चे २२ लाख, CBSE चे १७ लाख, CUET चे १६ लाख आणि SSC GD चे ४० लाख अशा एकूण १ कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि भविष्याशी खेळ मांडला गेला आहे. यामुळे तरुण वर्ग प्रचंड चिंतेत आणि दबावाखाली आहे. या सर्व प्रकाराची जबाबदारी कोणाला तरी घ्यावीच लागेल, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

'CJP' ची पार्श्वभूमी
अभिजीत दिपके हे सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय चेहरा आहेत. मे महिन्यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या विधानांवर उपरोधिक टीका करण्यासाठी 'कॉकरोच जनता पार्टी' CJP चे अकाऊंट सुरू केले होते. अल्पावधीतच हे पेज राजकीय मीम्स आणि सॅटायरचे मुख्य केंद्र बनले.

आज देशातील तरुण वर्ग या पेजच्या माध्यमातून व्यवस्थेविरोधातील आपला राग आणि मत व्यक्त करत आहे. आता सोशल मीडियावरील हा लढा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणार असल्याने या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.