Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"यश नशिबाने नाही, कष्टाने मिळते" - संस्थापक पृथ्वीराज पाटील; केंब्रिज स्कूलमध्ये गुणवंतांचा सन्मान.

"यश नशिबाने नाही, कष्टाने मिळते" - संस्थापक पृथ्वीराज पाटील; केंब्रिज स्कूलमध्ये गुणवंतांचा सन्मान.


मिरज :- यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल (मिरज) येथे सीबीएसई (CBSE) इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि गुणवत्तेचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शाळा परिसर आनंद आणि अभिमानाच्या वातावरणाने न्हाऊन निघाला होता.
​यंदाच्या दहावीच्या परीक्षेत शाळेने '१०० टक्के' निकालाची आपली गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. परीक्षेत समृद्धी पाटील हिने ९८.४०% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. त्याखालोखाल ईश्वरी पाटील (९८%), प्रांजल साळे (९६.८०%), शिवानी पाटील (९५.८०%), आदिती चवदार (९५%) आणि अर्षद मकानदार (९५%) यांनी घवघवीत यश संपादन केले.
​विशेष म्हणजे, एकता पवार आणि मनस्वी लकडे यांनी मराठी विषयात, तर अद्वैत जाधव याने आयटी (IT) विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष ठसा उमटवला. याशिवाय शाळेतील २५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त, तर ३५ विद्यार्थ्यांनी ७५% पेक्षा जास्त गुण मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या पालक आणि शिक्षकांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.


​यश नशिबाने नाही, कष्टाने मिळते: पृथ्वीराज पाटील

कार्यक्रमात बोलताना शाळेचे संस्थापक पृथ्वीराज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "यश हे कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असते. यश नशिबाने नाही तर कष्टाने मिळत असते. विद्यार्थ्यांनी या यशाला पुढील वाटचालीची प्रेरणा मानून भविष्यात अधिक उंच भरारी घ्यावी."
​यावेळी शाळेचे विश्वस्त वीरेंद्र पाटील व समन्वयक सतीश पाटील यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका ख्रिस्टीना मार्टिन, प्रशासक रफिक तांबोळी, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर, समन्वयक अश्विनी येळकर, तसेच श्रीदेवी कुल्लोळी, साहेबलाल शरीकमसलत आणि गजबर सर यांनी विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
​सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय शाळेचे उत्कृष्ट मार्गदर्शन, शिक्षकांची मेहनत आणि पालकांचा पाठिंबा यांना दिले. "यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे भविष्यातील यशस्वी भारताची पायाभरणी" या भावनेने संपन्न झालेला हा सत्कार समारंभ उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.